Lok Sabha Election 2024 : चार जागांवरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला ठाम निरोप, वेगळी भूमिका घेणार?

Shivsena Shinde Group Vs Bjp : महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या जागावाटपावरून रणकंदन सुरू आहे.
eknath shinde amit shah
eknath shinde amit shahsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेच्या ( Lok Sabha Election 2024 ) चार जागांवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत कमालीचा हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. शिर्डी, ठाणे, दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागांचा तिढा कायम राहिल्यास शिवसेना महायुतीत या चार मतदारसंघांबाबत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चारही जागा मूळ शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे भाजप या जागांबाबत परस्पर निर्णय घेऊन शकत नाही. या जागा शिवसेनाच लढवणार असल्याचा ठाम निरोप शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी कळवला आहे.

महायुतीतील भाजप ( Bjp ) आणि शिवसेनेमध्ये ( Shivsena ) सध्या जागावाटपावरून रणकंदन सुरू आहे. याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे, महायुतीत येऊ घातलेल्या मनसेच्या एन्ट्रीची! शिर्डी, ठाणे, दक्षिण मुंबई आणि नाशिक या चार जागा मूळ शिवसेनेकडे आहे. या चारही जागांवरून भाजपकडून शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. परंतु, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी या चारही जागा शिवसेनेकडेच राहतील, असा निरोप भाजपला पोहोचवला आहे. चारही मतदारसंघात शिवसेनेकडे निवडून येतील, अशी आवश्यक समीकरणे आहेत. या समीकरणांची मांडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भाजपसमोर मांडणी केली आहे. या चारही मतदारसंघांतील शिवसेनेकडील इच्छुकांची नावेदेखील एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पाठवली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागांवर दावा करताना या जागा मूळ शिवसेनेच्या असल्याचा दावा केला आहे. शिर्डीत सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ), नाशिकमध्ये हेमंत गोडसे ( Hemant Godse ), ठाण्यात राजन विचारे ( Rajan Vichare ) आणि दक्षिण मुंबईत अरविंद सावंत ( Arvind Sawant ) शिवसेनेकडून निवडून आले आहे. यात ठाण्यातील राजन विचारे आणि दक्षिण मुंबईतील अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाकडे गेले आहेत. उर्वरीत दोघे लोखंडे आणि गोडसे शिंदे गटात आहेत. त्यामुळे या चारही जागा शिवसेनाच लढवणार, असा ठाम दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर केला आहे.

eknath shinde amit shah
Tanaji Sawant News: पक्षशिस्तीची ऐसी-तैसी करत शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा पोरकटपणा; विरोधकांना गुदगुल्या

या चार जागा भाजप स्वतः कडे घेऊन महायुतीत येऊ घातलेल्या मनसेबरोबर त्यावरून चर्चा करणार असल्याचा संशय शिवसेना शिंदे गटाला आहे. मनसेबरोबर चर्चा करताना शिवसेनेच्याच जागा का, असा खल शिवसेना शिंदे गटात सुरू झाला आहे. या चारपैकी दोन जागा मनसेला आणि दोन जागा भाजप आपल्याकडे ठेवणार, असल्याची चर्चा आहे. यामुळे चारही जागांबाबत शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे सावध आणि आक्रमक झाले आहेत. यात ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होमग्राउंड आहे. तिथे शिवसेनेचाच उमेदवार हवा, असा आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांनी कायम ठेवला आहे.

नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपकडून तयारी करत असलेले शांतीगिरी महाराज कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी येथे अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभेची जागा मनसेला देण्याची चर्चा आहे. वेळप्रसंगी नाशिकचीदेखील जागा भाजप मनसेला देऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट सावध झाला आहे. या चारही जागांवरचा दावा कायम ठेवला आहे.

R

eknath shinde amit shah
Raj Thackeray News : भाजपचे पापक्षालन, ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना परत ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com