Maharashtra Political News : महायुती-महाविकास आघाडीमुळे वाढले उमेदवारांचे बळ अन् बजेटही...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका राज्यात महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा थेट होत आहेत. दोन्ही बाजूने उमेदवारांना बळ दिले जात असून प्रचारही जोरदार सुरू आहे.
Mahayuit, Mahavikas Aghadi
Mahayuit, Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राजकारणात सत्तेसाठी तडजोडी नव्या नाहीत. अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्याच निवडणुकीत सत्तेची गणित जुळवताना वरिष्ठ पातळीवर धक्कादायक निर्णय घेतले जातात. राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political News) तीन वर्षांपुर्वी शिवसेना-भाजप युतीला विधानसभेत स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

अडीच वर्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आघाडी सरकार होते. याचा सूड भाजपने शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी फोडून उगवला आणि राज्यात महायुती जन्माला आली. दोन वर्षापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आहे. आता लोकसभा निवडणुका राज्यात याच महाविकास आघाडी व महायुतीकडून एकत्रितपणे लढवल्या जात आहेत. (Latest Political News)

Mahayuit, Mahavikas Aghadi
Aditya Thackeray's Sabha : मुख्यमंत्री शिंदेंचा डोळा असलेल्या कन्नड मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा...

राज्यातील लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) 48 मतदारसंघात आघाडी-युतीचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. दोन्ही बाजूंनी प्रमुख तीन आणि छोट्या-मोठ्या अशा डझनभर पक्षांमुळे आघाडी-युतीच्या उमेदवारांना बळ मिळाले आहे. पण याचबरोबर युती आणि आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणूक म्हटलं की प्रचार, सभा, पदयात्रा, नेत्यांचे दौरे आणि कार्यकर्त्यांची सगळी सोय यासाठी प्रचंड खर्च लागतो. (Mahavikas Aghadi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने (Election Commission) घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत हे सगळं बसवणं तसं कठीण, पण यातून पळवाटा शोधल्या जातात. स्वबळावर निवडणूक लढवली तर केवळ आपल्याच पक्षाच्या लोकांना सांभाळावे लागते, त्यामुळे फारसा आर्थिक ताण उमेदवारावर येत नाही. पण आघाडी आणि युतीमुळे दोन्हीकडच्या उमेदवारांना अनेक पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सरबराई करावी लागत आहे.

यातून उमेदवारांचे बजेट पार कोलमडून गेले आहे. सत्ताधारी पक्षांना आर्थिक रसद पुरवली जाते, पण विरोधी आघाडीच्या उमेदवारांना ती फारशी मिळत नाही. अशावेळी उमेदवारांना पदरमोड करावी लागते. युती-आघाडीमुळे विजयाची खात्री असली तरी अवाढव्य खर्चामुळे उमेदवारांना मात्र चांगलाच घाम फुटतो.

त्यामुळे कागदावर आणि कानाला ऐकायला महायुती-महाविकास आघाडी चांगली वाटत असली तरी उमेदवारांसाठी मात्र अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने डोकेदुखी ठरत आहे. बरं एवढं करून मित्रपक्ष प्रामाणिकपणे काम करतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे उमेदवारांची अवस्था मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

Mahayuit, Mahavikas Aghadi
Jalna Loksabha Constituency : मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com