Lok Sabha Election 2024 : आमदार म्हणताहेत, "मला 'खासदार' झाल्यासारखं वाटतंय!"

MLA In Lok Sabha Election 2024 : कोण आहेत जे पाहत आहेत खासदारकीची स्वप्नं ?
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

संदीप चव्हाण -

Maharashtra News : महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत, तर एक आमदार विधान परिषद सदस्य आहेत. या आमदारांना आता खासदारकीचे वेध लागले असून, संसद प्रवेशाच्या ते प्रतीक्षेत आहेत. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Solapur NCP : उत्तम जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही; जिल्हाध्यक्षांनी सुनावले

कोण आहेत जे पाहत आहेत खासदारकीची स्वप्नं ?

नागपूर लोकसभा -

1 विकास ठाकरे - काँग्रेस (मविआ)

आमदार - नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - नितीन गडकरी - भाजप (महायुती)

चंद्रपूर लोकसभा

2 सुधीर मुनगंटीवार - भाजप (महायुती)

आमदार - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ

3 - प्रतिभा धानोरकर - काँग्रेस (मविआ)

आमदार - वरोरा विधानसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा

4 - बळवंत वानखेडे - काँग्रेस (मविआ)

आमदार - दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - नवनीत राणा - भाजप (महायुती)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

सोलापूर लोकसभा

5 राम सातपुते भाजप (महायुती)

आमदार - माळशिरस विधानसभा मतदारसंघ (माढा लोकसभा)

6 प्रणिती शिंदे- काँग्रेस (मविआ)

आमदार - सोलापूर शहर मध्य मतदारसंघ

सातारा लोकसभा

7 शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी शरद पवार गट (मविआ)

आमदार - विधान परिषद

लढत कुणाशी - उदयनराजे भोसले - भाजप (महायुती)

छ. संभाजीनगर लोकसभा

8 रोहयो मंत्री संदीपान भुमरे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - पैठण विधानसभा मतदारसंघ (जालना लोकसभा)

लढत कुणाशी - चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट)/ इम्तियाज जलील (एमआयएम)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेला कधी मिळणार दुसऱ्या महिला खासदार?

पुणे लोकसभा

9 रवींद्र धंगेकर - काँग्रेस (मविआ)

आमदार - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - मुरलीधर मोहोळ - भाजप (महायुती)

मुंबई दक्षिण लोकसभा

10 यामिनी जाधव - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - भायखळा विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - अरविंद सावंत - शिवसेना ठाकरे गट (मविआ)

मुंबई उत्तर मध्य लोकसभा

11 वर्षा गायकवाड - कॉंग्रेस (मविआ)

आमदार - धारावी विधानसभा मतदारसंघ (मुंबई दक्षिण मध्य लोकसभा)

लढत कुणाशी - उज्ज्वल निकम - भाजप (महायुती)

ईशान्य मुंबई लोकसभा

12 मिहिर कोटेचा - भाजप (महायुती)

आमदार - मुलुंड विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - संजय दिना पाटील - शिवसेना ठाकरे गट (मविआ)

Lok Sabha Election 2024
Bhushan Patil : मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसची भूषण पाटलांना उमेदवारी; पीयूष गोयलांशी लढत!

वायव्य मुंबई लोकसभा

13 आ. रवींद्र वायकर - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

लढत कुणाशी - अमोल कीर्तिकर - शिवसेना ठाकरे गट (मविआ)

दोन आमदारांचा लोकसभा उमेदवारीसाठी राजीनामा -

Lok Sabha Election 2024
Hemant Godse News : उमेदवारी मिळताच खासदार हेमंत गोडसे पोहोचले थेट भाजप कार्यालयात

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत नीलेश लंके आणि राजू पारवे हे दोन माजी आमदारही आपलं नशीब आजमावताहेत. नीलेश लंके नगरमधून तर राजू पारवे रामटेकमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदाचा तर राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी उमरेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. थोडक्यात काय तर या 13 पैकी किती आमदारांचं खासदारकीचं स्वप्न पूर्ण होणार आणि किती जणांचं भंग पावणार हे येत्या 4 जून रोजीच कळणार हे नक्की!

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com