Bhushan Patil : मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसची भूषण पाटलांना उमेदवारी; पीयूष गोयलांशी लढत!

Mumbai North Lok Sabha Constituency : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली.
Bhushan Patil
Bhushan PatilSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र तरीही अद्यापर्यंत महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. मित्रपक्षात चर्चेच्या फेऱ्या सुरू असून मतदारसंघ मिळवण्यासाठी ओढाताण सुरू असल्याचे दिसत आहे. अशात ज्या मतदारसंघावर तोडगा निघाला, तेथील उमेदवाराची तत्काळ घोषणा केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेसने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील(Bhushan Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर केली. ज्यामध्ये चार उमेदवारांची नावे होती. त्यापैकी केवळ एकच नाव हे महाराष्ट्रातील होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhushan Patil
Yamini Jadhav : दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिकांमध्ये 'टफ फाइट'! अरविंद सावंतांविरोधात यामिनी जाधव लढत जाहीर

महायुतीकडून मुंबई उत्तर मतदारसंघात याआधीच उमेदवार जाहीर झालेला आहे. केंद्रीयमंत्री पीयूष गोयल(Piyush Goyal) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट सुद्धा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होता. या ठिकाणी विनोद घोसाळकर(Vinod Ghosalkar) यांच्या नावाची चर्चा होती. परंतु काँग्रेसने ही जागा सोडली नाही. काँग्रेस कमिटीमधील भूषण पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Bhushan Patil
Kalyan Lok Sabha News : दरेकरांचे टेन्शन वाढले; उमेदवारी अर्ज दाखल करताच डोंबिवलीत ठाकरे गटात वादाचा भडका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com