Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेला कधी मिळणार दुसऱ्या महिला खासदार?

Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यातून आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसचा खासदार झाले आहेत. भाजपचे आतापर्यंत चार वेळा खासदार झाले.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : देशात लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 या वर्षी झाली. देशाच्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीने पुणे शहराने राज्याला पुण्याला आणि राज्याला पहिल्या महिला खासदार दिला होता. 1952 मध्ये इंदिरा मायदेव या पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सत्तर वर्षांमध्ये पुणे लोकसभेतून एकही महिला खासदार निवडून गेलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे शहर आजही महिला खासदाराच्या प्रतीक्षेत आहे. (Latest Marathi News)

पुणे लोकसभा या मतदारसंघात मोठ्या आणि राष्ट्रीय पक्षांनीही महिला नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत रस दाखवले नाही. सत्तर वर्षांमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात पुरुष नेत्यांचे, उमेदवारांचेच वर्चस्व राहिले. यामुळे या मतदारसंघातून इंदिरा मायदेव यांच्यानंतर एकदाही महिला नेत्याची निवड खासदार म्हणून झाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

काँग्रेस आणि भाजपचा दबदबा -

पुणे लोकसभा मतदारसंघावर नेहमी काँग्रेसचा वर्चस्व राहिले तर मागील दहा वर्षांपासून पुण्यात भाजपचा खासदार आहे. पुण्यातून आतापर्यंत दहा वेळा काँग्रेसचे (Congress) खासदार झाले आहेत. भाजपचे आतापर्यंत चार वेळा खासदार झाले. तर प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष आणि जनता पक्षाचा प्रत्येकी एकवेळेस खासदार राहिले आहेत.

Lok Sabha Election 2024
NCP News: दक्षिण महाराष्ट्रातून ‘घड्याळ’ गायब ; पुणे जिल्ह्यात दोनच ठिकाणी उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

कोण होत्या पुणे लोकसभेच्या एकमेव महिला खासदार ?

1052 या वर्षी देशाची पहिली लोकसभा निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत पुणे लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान हा इंदिरा मायदेव यांना मिळाला होता. मायदेव या पुणे दक्षिणमधून (तत्कालीन लोकसभा मतदारसंघ) विजयी झाल्या.

तब्बल 1 लाख 14 हजार 720 मते त्यांनी मिळवली. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे यासारख्या दिग्गज नेते समोर असताना त्यांनी हा विराट विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी तब्बल 64 टक्के इतकी होती.

By - Chetan Zadpe

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com