Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल किती वाजता येणार?

Election commission : प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पोलिस पथक तसेच सुरक्षारक्षक दलांचा बंदोबस्त आहे. शिवाय ईव्हीएमवर सीसीटीव्हीची देखील नजर आहे
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024sarkarnama

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला होत आहे. या मतदानानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये चार जूनला लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार? राहुल गांधीचे नेतृत्व चालणार का? या साऱ्यांची उत्तरे चार जूनला मिळतील मात्र, चार जूनला पहिला निकाल किती वाजता येणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. Lok Sabha Election 2024

सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटची मोजणाी होईल. तर 8.30 वाजता ईव्हीएमची EVM त्यामुळे सकाळी 9 वाजता ईव्हीएमच्या पहिल्या राऊंडचा निकाल जाहीर होईल.प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतमोजणी दिवशी मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस Police बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Lok Sabha Election 2024
Chhagan Bhujbal News: भुजबळांच्या विधानात चुकीचं काय? राष्ट्रवादीच्या नेत्यानं घेतला राणेंचा समाचार

सीसीटीव्हीद्वारे लक्ष

ईव्हीएममध्ये मतदान बंद झाल्यानंतर ईव्हीएम मशिन गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पोलिस पथक तसेच सुरक्षारक्षक दलांचा बंदोबस्त आहे. शिवाय ईव्हीएमवर सीसीटीव्हीची देखील नजर आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी सीसीटीव्ही रुममधून ईव्हीएमवर लक्ष ठेवून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हायव्होल्टेज लढती

महाराष्ट्रात बारामती, माढा, शिरूर,बीड, नगर, सांगली, सोलापूर, अमरावती, कल्याण, ठाणे या मतदारसंघात हायव्होल्टेज लढती होत आहेत. या लढतींकडे लक्ष असणार आहे. या लढतींचे निकाला काय असणार यावर देखील विधानसभेतील राजकीय पक्षांची गणित अवलंबून असतील.

Lok Sabha Election 2024
Pune Porsche Accident : माज उतरेना! बाप-लेकाकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे; चालकाचे धक्कादायक खुलासे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com