Nitin Gadkari News : गडकरींवर दीड कोटींचं कर्ज, जुनी अ‍ॅम्बेसिडर पार्किंगला

Nitin Gadkari Net Worth News : नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे
Nitin Gadkari
Nitin Gadkarisarkarnama

केंद्रातील मोदी सरकारमध्ये 10 वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधींची घोषणा करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची ओळख आहे. देशातील मोठ मोठ्या महामार्ग बांधकामांमुळे त्यांना 'इन्फ्रास्ट्रक्चर मॅन' म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, मोठ मोठे महामार्ग उभारणाऱ्या नितीन गडकरी यांची संपत्ती किती? असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यातच आता नागपूर लोकसभा मतदारसंघातून ( Nagpur Lok Sabha Constituency ) उमेदवारी अर्ज भरताना नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि जलसंपदामंत्री असलेले नितीन गडकरी हे इंधनाच्याऐवजी इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देतात. पण, अद्यापही गडकरींच्या पार्किंगमध्ये 'अ‍ॅम्बेसिडर' कार आहे, तर गडकरींच्या संपत्तीत पाच वर्षांत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चल अन् अचल संपत्ती किती?

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, गडकरींकडे ( Nitin Gadkari ) 1 कोटी 32 लाख 90 हजार रुपयांची चल संपत्ती आहे, तर, 4 कोटी 95 लाख रुपयांची अचल संपत्तीही त्यांच्याकडं आहे. त्यांच्यावर 1कोटी 66 लाख 82 हजार रुपयांचं कर्ज आहे, तर 31 लाख 88 हजार रुपयांचे दागिनेही गडकरींकडे आहेत. 29 लाख 40 हजार रुपये किमतीची 'अ‍ॅम्बेसिडर' आणि 'होंडा'ची कारही गडकरींच्या पार्किंगमध्ये आहे.

2019 मध्ये गडकरींनी केला पटोलेंचा पराभव

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यात लढत झाली होती. पण, या निवडणुकीत गडकरींचा करिष्मा कामी आला आणि भाजपनं पुन्हा एकदा ही जागा आपल्या खिशात घातली. गडकरींनी 2 लाखांहून अधिक मतांनी नाना पटोलेंचा पराभव केला. नितीन गडकरींना 6 लाख 60 हजार 221 मते मिळाली होती. तर, नाना पटोले 4 लाख 44 हजार 212 मतांसह दुसऱ्या क्रमाकांवर होते.

गडकरी हॅट्ट्रिक साधणार की, काँग्रेस पुनरागमन करणार?

2024 मध्ये नागपूरमधून नितीन गडकरी यांच्याऐवजी अन्य एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्याची अटकळ व्यक्त केली जात होती. पण, ही अटकळ हवेतच विरली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या गडकरींना भाजपनं पुन्हा एकदा उमेदवारी दिली. आता त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे ( Vikas Thakre ) यांच्याशी होणार आहे. त्यामुळे गडकरी येथून विजयाची हॅट्ट्रिक साधणार की, काँग्रेस पुनरागमन करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत नितीन गडकरी; तोडफोडीवर ‘नो कॉमेंट्‍स’ !

विकास ठाकरे यांची संपत्ती किती?

उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी चल आणि अचल संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार ठाकरेंकडे 1 कोटी 29 लाख 65 हजारांची चल, तर 69 लाख 10 हजारांची अचल संपत्ती आहे. 4 लाख 65 हजारांच्या दागिन्यांसह 1 कोटी 51 लाख 41 हजारांचं कर्जही ठाकरेंवर आहे. 72 लाखांच्या किमतीची 'बीएमडब्लू'ही कारही ठाकरेंकडे आहे, तर पाच वर्षांत ठाकरेंच्या संपत्तीत 63 टक्के वाढ झाली आहे.

R

Nitin Gadkari
Nitin Gadkari : दुसऱ्या निवडणुकीत घटले होते गडकरींचे मताधिक्य, या वेळी हॅट्ट्रिकची संधी !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com