Amravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. रिपब्लीकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी तीनच दिवसांपूर्वी अमरावतीच्या निवडणुकीतून माघार घेत आहोत, असे जाहीर केले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीने देऊ केलेला पाठिंबा त्यांनी स्वीकारला आहे. यामुळे आता अमरावतीच्या (Amravati Lok Sabha Constituency) निवडणुकीत मोठी चुरशीची लढत होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
आनंदराज आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. मात्र आता मी हा माघार घेण्याचा निर्णय माघारी घेत आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवणार आहे. अमरावतीत आंबेडकरी विचारांचा उमेदवार नसल्याने मतदान नेमकं कुणाला करायचे याबाबत मतदारांपुढे संभ्रम होता. यामुळे मी आता माझी उमेदवारी कायम ठेवणार आहे. मी पूर्ण ताकदीनिशी लढणार असून वंचितने जो मला मला पाठिंबा दिला आहे, त्याचाही मी स्वीकार करत आहे, असे आंबेडकर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझ्या निवडणुकीतून (Election) माघारानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली. काही जणांनी तर आत्मदहानाचा इशारा दिला. त्यांच्या या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढवणार आहे, असे सांगतानाच त्यांनी इंदू मिल स्मारकाचं श्रेयही घेतले. इंदू मिलचं काम माझ्यामळेच सुरु झालं होतं, त्यामुळे माझं काम किती हे मला कुणालाही सांगायची गरज नाही, असे आंबेडकर म्हणाले.
आनंदराज आंबेडकर यांच्या रिएन्ट्रीमुळे आता अमरावती लोकसभेची निवडणूक चौरंगी झाली आहे. भाजपकडून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे प्रमुख उमेदवार आहेत. तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून दिनेश बूब यांनी सुद्धा अमरावतीत शड्डू ठोकला आहे. तर आता आंबेडकरी विचारधारा घेऊन आनंदराज आंबेडकर हे सुद्धा निवडणूक लढवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.