Lok Sabha Election News: ...म्हणून 'हे' तीन भाजप नेते लोकसभेचे उमेदवार नसणार?

Political News : भाजप निरीक्षक सुचविणार केंद्रीय समितीकडे खासदारांसोबतच दोन जणांची नावे.
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे उपस्थितीत गुरुवारी 29 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर लगेचच भाजपची 100 उमेदवारीची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत 2019 मधील पराभूत जागेवरील उमेदवाराचा समावेश असू शकतो. मात्र, भाजपने राज्यातील निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. निरीक्षक म्हणून या तीन जणांची नियुक्ती करण्यात आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामध्ये या तीन भाजप नेत्याचा समावेश असल्याने हे लोकसभेचे उमेदवार नसणार आहेत.

भाजपने राज्यातील निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे. हे निरीक्षक गेल्या वेळी जिंकलेल्या 23 जागेवर जाऊन आढावा घेणार आहेत. गुरुवारी 29 फेब्रुवारीला त्यांची बैठक होणार आहे. हे निरीक्षक स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. त्याशिवाय स्थानिक खासदारास दोन पर्याय कोण असू शकतात ? याचीही चाचपणी करणार आहेत. या तीन जणांच्या नावाची यादी निरीक्षक भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवणार आहेत. त्यापैकी एक नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते.

(Lok Sabha Election News)

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Girish Mahajan On Jarange : 'मनोज जरांगेंना आता माफी नाही' ; फडणवीसांवरील टीका महाजनांच्या जिव्हारी!

राज्यातील 'या' नेत्यावर निरीक्षकाची जबाबदारी

राज्यातील भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे तीनही भाजप (Bjp) नेते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. या आजी-माजी मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता होती. मात्र, निरीक्षक म्हणून या तीन जणांची नियुक्ती करण्यात आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुंडे, महाजन, मुनगंटीवार निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा

भाजपकडून 23 लोकसभांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तर पुणे लोकसभा मतदारसंघाची आशिष शेलार, सोलापूरचे निरीक्षक म्हणून मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे, महाजन, मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्या यादीत असणार नवे चेहरे

भाजपची 100 उमेदवारीची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सध्याच्या काही खासदारांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधून काही नवीन नावे समोर येऊ शकतात. दिल्लीतील सात जागांसाठी भाजप नवीन चेहरे उभे करू शकतो, अशी चर्चा आहे.

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Latur BJP Politcal News : बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं काय होणार?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com