Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधानांनतर भाजपकडून त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात येत आहे. आता भाजपचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यांनंतर आता जरांगेंनी माफी नाही, असे वक्तव्य महाजन यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Girish Mahajan On Manoj Jarange Patil News)
"मराठा आरक्षणावर सरकारकडून नेहमी सकारात्मक भूमिका घेण्यात आली. मनोज जरांगे यांना अनेकदा मर्यादेच्या बाहेक जाऊन सहकार्य करण्यात आलं. समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून सरकारकडून त्यांचा नेहमीच यथोचित सन्मान करण्यात आला. मात्र समाजाला पुढे करुन, समाजाला ढालीसारखे वापरत त्यांनी स्वत:चा राजकीय अजेंडाच राबवायला घेतला आहे, असा हल्लाबोल महाजन केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाजन पुढे म्हणाले, "मनोज जरांगेंना वेळोवेळी आमच्याकडून सहकार्य करण्यात आलं. त्यांच्या उपोषणस्थळी मी स्वत सहा वेळा गेलो आहे. माझ्यासोबत आमच्या मंत्रिमंडळातील सहकाराही होते. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कित्येकवेळा प्रोटोकॉल मोडत जरांगेंच्या आंदोलनस्थळी गेले होते. जरांगेंच्या सांगण्यानुसार अनेक निर्णय घेतले. मात्र तरीही मी बोलेन तसं करा ही हटवादी भूमिका त्यांनी घेतली. मुख्यमंत्री शिंदे तसेच मंत्री भुजबळ यांना तर बोललेच, मात्र त्यांनी कळस गाठत आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही अश्लाघ्य शब्दात बोलले. जातीवाचक शिवीगाळ केली. आई-बहिणीवरुन बोलले, त्यामुळे आता त्यांना माफी नाही," असे महाजन बोलले.
"महाराष्ट्रातील जनतेला जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) जे काही बोलले ते पटलेले नाही. मराठा बांधवांनाही ते आवडलं नाही. म्हणून जरांगेंनी यांना आता आपल्या आवाक्यात जेवढे बसेल तेवढेच बोलावे. तुम्हाला आयुष्यातून उठवू, संपवू, पक्षाचा सत्यानाश करु, असं ते म्हणाले. पंतप्रधानांचाही (Narendra Modi) एकेरी उल्लेख केला. लोकांची गर्दी करुन डोक्यात हवा गेली आहे. आता लोकांनीही त्यांनी खाली उतरवले आहे, ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि ठाकरे गटाची स्क्रिप्ट वाजवत आहेत, असेही महाजन म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.