Shivsena Vs BJP: चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाल्या, तुमच्यासारख्या कंपाऊंडरची...

Chitra Wagh On Sanjay Raut: "तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात. कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का?"
Devendra Fadnavis, sanjay Raut, Chitra Wagh
Devendra Fadnavis, sanjay Raut, Chitra WaghSarkarnama

Chitra Wagh On Sanjay Raut: लोकसभा निवडणुकांमुळे (Lok Sabha Election) देशासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षातील नेते विरोधकांवर टीका आणि आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. तसेच निवडणुकीच्या काळात राज्यातील अनेक वरिष्ठ आणि प्रमुख नेते वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत. असाच एक गौप्यस्फोट भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंबाबत केला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 1999 पासूनच मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नं पडत होतं. पण त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत येत नसल्यामुळे त्यांनी अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांचा 'राजकारणातील कच्चे मडके' असा उल्लेख केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कारण राऊतांच्या वक्तव्यावर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय राऊत यांच्या टीकेवर चित्रा वाघ यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलं, "ओ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी (Devendra Fadnavis) राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत. तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात.

कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कम अस्सल खोटा शिक्का? देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धवजींसाठी जपून ठेवा. आमच्या नेत्यांबाबत खालच्या पातळीची भाषा वापराल तर त्याचं भाषेत तुम्हाला उत्तर देऊ, असा इशाराच वाघ यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले की, आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आमची स्वप्न ही राष्ट्राच्या हिताची असतात. तुम्हाला जो स्वप्नातला आजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Devendra Fadnavis, sanjay Raut, Chitra Wagh
Uddhav Thackeray News : गझनी सरकार, भेकड लोक, निवडणूक आयोग नोकर अन्...; ठाकरेंच्या मुलाखतीतील मुद्दे वाचा

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्वप्न पडत नाहीत. आमची स्वप्न ही राष्ट्राच्या हिताची असतात. तुम्हाला जो स्वप्नातला आजार झाला होता, तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेय. फडणवीसांना फार गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहेत."

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com