Loksabha Election : भाजपचे दिग्गज नेते लोकसभेच्या आखाड्यात उतरणार ; पंकजा मुंडेंसह 'या' नावांची चर्चा

Politcal News : भाजप, शिंदे गट, अजित पवार गट मित्र पक्षाने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिकंण्याचा निर्धार केला आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट मित्र पक्षाने राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिकंण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार उतरविण्यात येणार आहे. महायुती सरकारमधील वजनदार मंत्री लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात येणार आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश व मराठवाड्यातील चार ते पाच मंत्र्याची नावे लोकसभा निवडणुकीसाठी फायनल केली आहेत.

Pankaja Munde
Political News : शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात भाजप पेटून उठले; भ्रष्टाचारावरून नगर महापालिकेत वातावरण तापले

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती व महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरु आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्याप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे (Eaknath Shinde) यांचे मंत्रिमंडळातील भाजपचे वजनदार मंत्र्यांना उतरविण्याची तयारी केली जात आहे. सध्या मुंबईत महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी बैठका घेण्यात येत आहेत. त्यासाठी वरिष्ठ पदधिकारी उपस्थित राहून आढावा घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोयल, सीतारामन, पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Panakaja munde) यांना बीड लोकसभेसाठी उमेदवार दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यात भाजपातील सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर मुंबई मतदार संघातून केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल अथवा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या नावावर विचार सौर असल्याचे समजते.

युवा, नव्या चेहऱ्यांना संधी

भाजप श्रेष्ठींने या निवडणुकीचे निमित्त साधून राज्यातील काही वजनदार मंत्री, नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच राज्यात युवा व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. विजय मिळवणारा उमेदवार हाच निकष असणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Pankaja Munde
Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’; लोकसभा-विधानसभा मतदारसंघात 'वॉर रूम' सुरू करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com