Political News : शिवसेना-राष्ट्रवादीविरोधात भाजप पेटून उठले; भ्रष्टाचारावरून नगर महापालिकेत वातावरण तापले

Nagar Corporation : सत्ताधारी शिवसेना (उबाठा गट)-राष्ट्रवादीवर (अजित पवार गट) निशाणा साधला आहे.
Nagar corpration
Nagar corpration Sarkarnama
Published on
Updated on

Political News : नगर शहरातील प्रश्नावरून दिवसेंदिवस भाजप आक्रमक भूमिका घेत असल्याने पुढचे राजकीय गणिते वेगळे असणार आहेत. त्यातच सत्ताधारी शिवसेना (उठाबा गट)-राष्ट्रवादीची (अजित पवार गट) कोंडी करण्याची संधी भाजपकडून सोडली जात नाही. त्यातच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना (उबाठा गट)- राष्ट्रवादीवर (अजित पवार गट) निशाणा साधला आहे.

नगर शहरातील पारिजात चौकातील विकास कामांचा उद्घाटन कार्यक्रमात अभय आगरकर यांनी नगरकरांना आता स्वच्छ, प्रामाणिकपणे समाजाचे काम करणारा सेवक हवा आहे. नगरकरांची ही अपेक्षा भाजप पूर्ण करण्याची क्षमता ठेवत असल्याचे म्हटले. अभय आगरकर यांचे हे विधान सध्या विरोधकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात भाजप नेमकी काय पेरणी करतो आहे, भविष्यात काय भूमिका असेल, याचा अंदाज आताच विरोधकांकडून घेतला जात आहे.

Nagar corpration
Assembly Winter Session : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; आमदार धंगेकरांकडून थेट मुख्यमंत्रीच टार्गेट

अभय आगरकर (Abhy Agarkar) म्हणाले, "महापालिकेत रोज कोणत्या न कोणत्या घोटाळ्याची माहिती समोर येत आहे. याला आता जनता कंटाळली आहे. नगरकरांना आता स्वच्छ, प्रामाणिकपणे समाजाचे काम करणारा सेवक हवा आहे. श्वान निर्बीजीकरणापासून फेज-टूच्या प्रश्नांवर आता महापालिका प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे". महापालिकेच्या गैरकारभारावर कोणीतरी आवाज उठविला पाहिजे तो आवाज भाजप उठवेल, असेही आगरकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरच्या विकास कामांसाठी आगामी काळात भाजप (Bjp) नगरकरांचा आवाज म्हणून काम करेल. देशात भाजपचे विकास पर्व सुरू असून ते अखंडपणे सुरु राहणार आहे. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजप हाच पर्याय असून भाजपचे नगरसेवक नगर शहराच्या विकासासाठी कार्यरत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजात राहून काम करावे, असे आवाहन देखील अभय आगरकर यांनी केले.

यावेळी नगरसेवक रामदास आंधळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला आघाडीचे अध्यक्ष प्रिया जानवे, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी आदी उपस्थित होते.

(Edited by Sachin Waghmare)

Nagar corpration
Nagar News: राधाकृष्ण विखे पाटलांना ठाकरे गट दुग्धभिषेक घालणार! काय आहे कारण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com