LPG-CNG Rate Hike : गॅस महागला, मग डिझेल-पेट्रोलचे काय? आजचे नवे दर जारी; चेक करा लेटेस्ट रेट

Petrol diesel latest rates today : LPG आणि CNG दरांमध्ये वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या आजच्या नव्या दरांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
LPG price hike September 2026
LPG CNG price hike todaySarkarnama
Published on: 
Updated on: 

Latest fuel rates today India: देशभरातील सर्वसामान्यांसाठी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबर 2026 रोजी इंधनाच्या दरांबाबत नवी अपडेट जाहीर करण्यात आली आहे. LPG आणि CNG-PNG दरवाढीमुळे काही ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले. आजही देशातील विविध शहरांमध्ये नागरिकांना जुन्याच दराने पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

LPG price hike September 2026
Anna Hazare News: मोठी बातमी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं दाखल...

मुंबईत पेट्रोलचा दर 111.21 रुपये प्रति लिटर असून डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. कोलकात्यात पेट्रोल 113.47 रुपये आणि डिझेल 99.55 रुपये प्रति लिटर आहे.

इतर शहरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. नोएडामध्ये पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 95.56 रुपये प्रति लिटर आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 110.93 रुपये, तर डिझेलचा दर 103.82 रुपये आहे. जयपूरमध्ये पेट्रोल 112.69 रुपये आणि डिझेल 97.78 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

Commercial LPG सिलेंडर महागला

1 सप्टेंबरपासून कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत 9.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना आता LPG सिलेंडरसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.

मुंबईत CNG-PNG ग्राहकांना मोठा झटका

मुंबई आणि उपनगरांतील CNG तसेच PNG ग्राहकांसाठीही महिन्याची सुरुवात महागाईने झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या दरात 2 रुपये प्रति किलो आणि PNG च्या दरात 1 रुपयांची प्रति युनिट वाढ केली आहे. ही दरवाढ 31 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून मुंबईत CNG चा नवा दर आता 88 रुपये प्रति किलो झाला आहे.

LPG price hike September 2026
India GDP Growth : GDP चे अच्छे दिन येताच पंतप्रधान मोदी भलतेच खूश; नवे रील करत परदेशी प्रवास अन् सोनं खरेदीबाबत केलं मोठं वक्तव्य

पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, रुपया-डॉलर विनिमय दर आणि इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे इंधनाचे दर रोज बदलू शकतात. नागरिकांनी पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे लेटेस्ट रेट तपासूनच आपल्या प्रवास आणि खर्चाचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com