LPG customers important update : LPG ग्राहकांनो सावधान! तुमचं गॅस कनेक्शन बंद होऊ शकतं; त्वरित करा 'हे' महत्त्वाचं काम

Gas connection update latest news : LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. KYC आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
LPG cylinder price hike in India
LPG cylinder price hike in India Sarkarnama
Published on
Updated on

तुमच्या घरात तु्म्ही अजूनही LPG सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी लागू केलेल्या नव्या नियमांमुळे आता अनेक ग्राहकांना LPG आणि PNG या दोन्ही गॅस सुविधा एकाच वेळी ठेवता येणार नाहीत. विशेष म्हणजे सरकारने दिलेली मुदत आता संपत आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांचे LPG कनेक्शन बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे ठरणार आहे.

मार्च 2026 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नैसर्गिक वायू व पेट्रोलियम उत्पादन वितरण आदेश 2026 लागू केला होता. या आदेशानुसार ज्या भागांमध्ये PNG म्हणजेच पाइपद्वारे गॅस पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ग्राहकांनी LPG वरून PNG कडे स्थलांतर करणे अपेक्षित आहे. यासाठी सरकारने 90 दिवसांची मुदत दिली होती.

LPG cylinder price hike in India
MLC Election Results : विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा धुव्वा; 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय, एक जागा कोणाला?

सरकारच्या या निर्णयामागे आयातीत LPG वरील अवलंबित्व कमी करणे, गॅसची काळाबाजार रोखणे आणि घराघरात स्वच्छ व सुरक्षित इंधन पोहोचवणे हा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे PNG सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये दुहेरी गॅस कनेक्शन ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जर तुमच्या परिसरात PNG सेवा सुरू असेल आणि तुम्हाला याबाबत सूचना मिळाल्यानंतरही तुम्ही PNG कनेक्शन घेतले नसेल, तर LPG पुरवठा बंद केला जाऊ शकतो. तसेच ज्यांच्याकडे आधीपासून PNG कनेक्शन आहे आणि ते अजूनही LPG सिलेंडर वापरत आहेत, त्यांना LPG कनेक्शन सरेंडर करावे लागणार आहे. मात्र ज्या भागांमध्ये अद्याप PNG नेटवर्क उपलब्ध झालेले नाही, त्या ग्राहकांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. अशा ठिकाणी LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.

LPG cylinder price hike in India
Nanded MLC Election : विधानपरिषदेचा निकाल लागताच बंडखोर खासदाराला पहिला दणका : उद्धव ठाकरेंकडून थेट लेकावर कारवाई

ग्राहकांनी सर्वप्रथम आपल्या भागात PNG सुविधा उपलब्ध आहे का याची खात्री करावी. सुविधा उपलब्ध असल्यास संबंधित गॅस कंपनीशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करून PNG कनेक्शनसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच वितरकाकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्ययावत असल्याची खात्री करावी, जेणेकरून पुढील सूचना आणि पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 1 लाख कुटुंबांनी LPG कनेक्शन सरेंडर करून PNGचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com