Nanded MLC Election : विधानपरिषदेचा निकाल लागताच बंडखोर खासदाराला पहिला दणका : उद्धव ठाकरेंकडून थेट लेकावर कारवाई

Krishna Patil Ashtikar Defeat : नांदेड विधानपरिषद निवडणुकीदरम्यान ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. ठाकरेंचे विश्वासू खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरेंच्या नगरसेवकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील संभ्रमात होते.
Krishna Patil Ashtikar
Krishna Patil AshtikarSarkarnama
Published on
Updated on

Nanded MLC Election: ऑपरेशन टायगर अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का बसला आहे.

नांदेड विधानपरिषद निवडणुकीत आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर निवडणुकीत पराभव होताच कृष्णा पाटील आष्टीकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट करत हकालपट्टी केल्याची माहिती दिली. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर ) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.'

Krishna Patil Ashtikar
Nashik MLC Election : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; नाशिकमधून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी

त्यामुळे आता आधी विधानपरिषदेत पराभव आणि त्यानंतर पक्षाने केलेल्या कारवाईमुळे आष्टीकर यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. कृष्णा पाटील आष्टीकर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.

आज या निवडणुकीची मतमोजणी झाली ज्यामध्ये त्यांना फक्त ८४ मतं मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मतं मिळाली असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना ५ मतं पडली. त्यामुळे अमरनाथ राजूरकर यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांचा २५५ मतांनी पराभव केला आहे.

Krishna Patil Ashtikar
Gokul Gite Nashik MLC : विजयानंतर गोकुळ गिते शिवसेनेच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईत बोलावून घेतलं, स्पेशल विमान धाडलं

नांदेड विधानपरिषद निवडणुकीदरम्यान ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू होती. ठाकरेंचे विश्वासू खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरेंच्या नगरसेवकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील संभ्रमात होते. या संभ्रमाचा फटका आता कृष्णा पाटील आष्टीकरांना बसल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com