

Maharashtra political election updates: राज्यातील नुकत्याच स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. हा विजयामुळे विरोधकांना मोठा धक्का मिळाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीपूर्वीच 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उरलेल्या ११ जागांवरही महायुतीने दमदार कामगिरी करत तब्बल 10 जागांवर दमदार कामगिरी केली आहे.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांनी प्रभावी कामगिरी केली. मात्र नाशिक मतदारसंघात महायुतीला अनपेक्षित धक्का बसला. येथे भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. त्यामुळे राज्यातील एकमेव जागा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या हाती न जाता अपक्षाकडे गेली.
निकालानुसार भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या. शिवसेनेच्या खात्यात 3 जागा गेल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला. याशिवाय 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. दुसरीकडे महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नाही.
ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर नागपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूर, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघांतही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत राज्यातील राजकीय समीकरणांवर आपली मजबूत पकड कायम असल्याचे दाखवून दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.