Lamborghini Car in Mantralaya : मंत्रालयात आलेल्या लॅम्बोर्गिनी कारचं गुढ वाढलं; एका मंत्र्यांचं नाव चर्चेत

Maharashtra Assembly Ministry Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी लॅम्बोर्गिनी कारमधून एक व्यक्ती आल्याची चर्चा आहे.
Lamborghini Car in Mantralaya
Lamborghini Car in Mantralaya Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मंत्रालयामध्ये बुधवारी आलेल्या आलिशान लॅम्बोर्गिनी कारची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. ही कार नेमकी कुणाची, कारमधील आलेली व्यक्ती कुणाला भेटली, याचे गुढ वाढत चाललं आहे. त्याला कारणही तसंच आहे. या कारची मंत्रालयात येताना तपासणी केली गेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कारमधून आलेली हायप्रोफाईल व्यक्ती कोण, असा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मंत्रालयामध्ये दररोज हजारो लोक विविध कामांसाठी येत असतात. राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना भेटतात. अनेक शिष्टमंडळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटतात. उद्योजक, व्यावसायिकांचीही ये-जा असते. पण मंत्रालयात प्रवेश देताना सुरक्षेच्या कारणास्तव पुरेशी काळजी घेतली जाते. तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो.

Lamborghini Car in Mantralaya
Vidhan Parishad 12 MLA : हायकोर्टाचा ठाकरेंसह 'मविआ'ला झटका,तर महायुतीला दिलासा; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची याचिका फेटाळली

बुधवारी काय घडलं?

मंत्रालयामध्ये बुधवारी एक आलिशान लॅम्बोर्गिनी कार आली होती. या कारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे या कारची तपासणीच झाली नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे या कारमधून कोणी हायप्रोफाईल व्यक्ती आले होते का, याबाबतही गुढ आहे. ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची चर्चा असल्याचे ‘साम’च्या वृत्तात म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा

लॅम्बोर्गिनी कारमधून आलेली व्यक्ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आली होती का, अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच कुणीही खुलासा केलेला नाही. त्यामुळे कार कुणाची, कोण आले होते, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Lamborghini Car in Mantralaya
Supriya Sule : वाल्मिक कराडचं 'ते' जुनं प्रकरण काढत सुप्रिया सुळेंचा थेट ED वर हल्लाबोल

संजय राऊतांसाठी गुढ

लॅम्बोर्गिनी कारबाबत आपण शोध घेत असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. हे गुढ धुमकेतूप्रमाणे आले आणि गायब झाले. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काही गोष्टी आमच्या हातात लागल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com