Supriya Sule : वाल्मिक कराडचं 'ते' जुनं प्रकरण काढत सुप्रिया सुळेंचा थेट ED वर हल्लाबोल

Supriya Sule on Walmik Karad : वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत कराडबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कराडवर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे.
Walmik Karad, Supriya Sule
Walmik Karad, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 09 Jan : वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांसह काही सत्ताधारी नेत्यांकडूनही केला जात आहे. मात्र, सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मात्र, कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पहिल्यापासून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी उचलून धरलं आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यानेच त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही केला जात आहे.

वाल्मिक कराडबाबत (Walmik Karad) दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत कराडबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कराडवर 8 महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यानंतरही त्याच्यावर ईडी आणि पीएमएलएने कारवाई करणे अपेक्षित असतानाही त्याच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

Walmik Karad, Supriya Sule
Bhaskar Bhagre Politics: राष्ट्रवादीच्या खासदार भगरे यांनी फटकारले, "मिटकरींना काहीच काम धंदे नाहीत"

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, पीएमएलए आणि ईडीची कारवाई वाल्मिक कराडवर आतापर्यंत का झाली नाही. वाल्मिक कराडच्या नावाने 2022 मध्येच ईडीने नोटीस काढली होती. त्यानंतर कारवाई झाली नाही. परंतु संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर काहीही पुरावे नसताना कारवाई करण्यात आली. शिवाय 8 महिन्यांपूर्वी अवधा कंपनीकडून FIR दाखल झाला तरीही कराडवर कारवाई का केली नाही असं प्रश्न उपस्थित केला.

Walmik Karad, Supriya Sule
Prithviraj Chavan Politics : पक्षातील नेते भडकताच पृथ्वीराज चव्हाणांची सारवासारव; म्हणाले, काँग्रेसने आता..!

तर आता या संदर्भात आम्ही अर्थ मंत्रालयाला पत्र देणार असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या. तसंच वाल्मिक कराडचा विषय राजकीय नाही तर तो सामाजिक विषय आहे, असंही सुळे म्हणाल्या. शिवाय यावेळी त्यांनी वाल्मिक कराडवर अनेक गुन्हे दाखल असताना परळीच्या लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपद त्याला दिले. गुन्हा दाखल असताना त्याला या महत्वाच्या योजनेचे अध्यक्ष का दिले? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com