Loksabaha Election : मोठी बातमी! ...तर महायुतीला धक्का देत जानकर धरणार महाविकास आघाडीची वाट

Ncp News : महायुतीसोबतच्या चर्चेनंतर अद्याप कसलाच फॉर्म्युला ठरला नसल्याने महादेव जानकर नाराज आहेत.
mahadev jankar
mahadev jankar Sarkarnama
Published on
Updated on

Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या बैठकांवर बैठका होत आहेत. त्यामध्ये राज्यातील महायुतीच्या घटकपक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपच्या हाती फारसे काही लागेल, असे दिसत नसल्याने व जागावाटपासाठीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होत नसल्याने ते नाराज असल्याचे समजते.

महायुतीच्या बैठकीनंतरही अद्याप कसलाच फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे जागावाटपामध्ये माजी मंत्री महादेव जानकर  यांच्या रासपच्या हाती फारसे काही लागेल, असे दिसत नसल्याने नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी जर येत्या काळात महाविकास आघाडीने रासपला राज्यातील दोन लोकसभेच्या जागा सोडल्या, तर महायुती सोडून त्यांच्यासोबत जाण्याची तयारी दर्शविली आहे.

mahadev jankar
Uddhav Thackeray : खासदार शिंदेंच्या मतदारसंघातून ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, 'कल्याण-डोंबिवली कुणाच्या बापाची...'

जानकर यांनी महाविकास आघाडीकडे रासपसाठी माढा, परभणी या दोन जागांची मागणी केली आहे. महाविकास आघाडी त्यांना येत्या काळात माढ्याची जागा सोडू शकते. मात्र, परभणीत शिवसेनेचे संजय जाधव (sanjay jadhav) दोन टर्म खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता कमी आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून रासपकडून महादेव जानकर (mahadev jankar) स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, तर परभणी लोकसभा मतदारसंघातून उद्योगपती अथवा सेवानिवृत्त अधिकाऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते या दोन जागांसाठी आग्रही असल्याचे समजते.

R...

mahadev jankar
Mahadev Jankar : 'भुजबळ हे आमचे दैवत, त्यांना धमकावल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही'; जानकरांचा इशारा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com