Mahadev Jankar : 'भुजबळ हे आमचे दैवत, त्यांना धमकावल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही'; जानकरांचा इशारा

Mahadev Jankar On Chhagan Bhujbal Death Threat : राष्ट्रवादीचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर महादेव जानकर यांनी इशारा दिला आहे.
mahadev jankar
mahadev jankarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री छगन भुजबळ यांना धमकी येणे चुकीचे आहे. त्यांना धमक्या देऊ नका, ते योग्य नाही भुजबळ हे आमचे दैवत असून, ओबीसी समाजाचे माईल स्टोन नेते आहेत. त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज दिला.

mahadev jankar
Chhagan Bhujbal : भुजबळांना जिवे मारण्याची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

कायद्याने आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न

जनस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जानकर हे नाशिक दौऱ्यावर आले. या वेळी जानकर यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी भुजबळ यांना धमकी दिल्यास महागात पडेल, असा थेट इशारा दिला. भुजबळ यांना धमक्या देऊन काहीही होणार नाही, हे योग्य नाही. कायद्याने आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही जानकर यांनी केले. राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर त्यांनी भाष्य केले.

'जनस्वराज्य यात्रा राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. यात्रेला राज्यात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळेच पक्ष आम्हाला यानिमित्ताने साथ देत आहे. परंतु राज्यात सध्या कोण बरोबर आहे व कोण विरोधात आहे हे कळत नाही', असे जानकर म्हणाले.

धनगर आरक्षणावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या टीकेवरही ते बोलले. 'झिरवाळ यांना असे बोलणे शोभत नाही. ते संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी संयमाने वक्तव्य केले पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहात. कोणत्याही जातीत मतभेद न करता सर्वांना आरक्षण दिले पाहिजे', असे ते म्हणाले.

'भाजप कॉंग्रेस सारखाच पक्ष'

मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आजपर्यंत खेळ केला आहे. भारतीय जनता पक्षही आता त्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस सारखा वागत आहे. आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रात विधेयक मंजूर केले पाहिजे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली.

mahadev jankar
Manoj Jarange Speech News : शिंदे समितीने काम थांबवावे, जरांगेंच्या मागणीने सरकारपुढे नवे संकट ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com