Raj Thackeray : 'साहेब, तुम्ही प्रयागराजला अंघोळ करू शकताय...;' NGT कडे आला अहवाल

Raj Thackeray : महाकुंभ मेळ्यादम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्यासह प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता ही स्नानासाठी योग्य होती असा अहवाल, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सादर केला आहे.
Raj Thackeray, Mahakumbh
Raj Thackeray, MahakumbhSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये कोट्यवधी लोकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी, अभिनेते, खेळाडू, उद्योजक, सेलिब्रेटी आणि अगदी परदेशी नागरिकांनी देखील महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केले. पण त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र गंगेतील दुषित पाण्यावर भाष्य करत टीका केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमधील आयोजित मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) बोलत होते. ते म्हणाले, बाळा नांदगावकर एका छोट्याश्या कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं, "हड... मी पाणी पिणार नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिलेत. कोण पिणार ते पाणी? आताच कोरोना गेलाय. त्याचं कुणाला देणं घेणं नाही दोन वर्षे तोंडाला फडकी लावून फिरला आहात आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत." असंही त्यांनी सांगितलं.

Raj Thackeray, Mahakumbh
MNS chief Raj Thackeray : 'डोळा मारला की, फुटपाथ बदलणारे राजकीय फेरीवाले पक्षात नकोत'; राज ठाकरेंची पक्षांतरावर बोचरी टीका

पण महाकुंभ मेळ्यादम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्यासह प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता ही स्नानासाठी योग्य होती असा अहवाल, उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने (युपीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सादर केला आहे. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे. प्रयागराज येथून विविधवेळी आणि विविध ठिकाणाहून नमुने गोळा करून त्याची तपासणी केली आहे. न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावर हा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अहवालानुसार प्रयागराज (Prayagraj) येथील नद्यांमधील पाण्याचे 12 जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा परीक्षण केले जात होते. यात गंगेतील पाच ठिकाणाहून आणि यमुनेतील दोन ठिकाणाहून नमुने गोळा केले जात होते. एकाच नमुन्यासाठी विविध मानकांच्या आधारे तपासणी केली जात होती. यात प्रामुख्याने, पीएच, डिझॉल्व ऑक्सिजन (डीओ), बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि फेकल कोलिफॉर्म काउंट (एफसी) यांची तपासणी केली जात होती.

Raj Thackeray, Mahakumbh
Raj Thackeray News : गंगेचं पाणी... हड, मी नाही पिणार! कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंचा सर्वात मोठा प्रहार

तज्ज्ञ समितीने या अहवालातील आकडेवारीमध्ये असलेल्या वैविध्याबद्दल माहिती देताना सांगितले की, नमुना घेतला त्या भागातील पाण्याची गुणवत्ता, तेथील भाविकांची बदलती संख्या प्रवाहाची स्थिती, नमुना घेण्याची वेळ यांसह अनेक घटकांमुळे आकडेवारीत वैविध्य दिसून येण्याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com