SSC-HSC Result : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; महसूल मंत्री बावनकुळेंचे 'अधिकाऱ्यांना' महत्वाचे निर्देश

SSC-HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल आज (5 मे) रोजी जाहीर झाला. तब्बल 91.88 टक्के निकाल लागला असून यात मुलींचे यश ठसठशीतपणे दिसून आले आहे.
Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule announces 48-hour deadline to issue certificates after 10th and 12th board results.
Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule announces 48-hour deadline to issue certificates after 10th and 12th board results.Sarkarnama
Published on
Updated on

SSC-HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा बारावीचा निकाल आज (5 मे) रोजी जाहीर झाला. तब्बल 91.88 टक्के निकाल लागला असून यात मुलींचे यश ठसठशीतपणे दिसून आले आहे. आता सीईटी आणि नीटचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची लगबग सुरु होईल. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज राजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनाने प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम करावे. तसेच विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले अर्ज केल्यापासून केवळ 48 तासांमध्ये द्यावेत. याबाबत केलेली कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. याकामी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात येईल,’’ असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule announces 48-hour deadline to issue certificates after 10th and 12th board results.
Vaibhavi Deshmukh HSC Result : संतोष देशमुखांच्या जिद्दी लेकीनं आपल्या ‘गुणां’नी महाराष्ट्राला जिंकलं! वैभवीचा बारावीचा निकाल जाहीर...

राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात बावनकुळे बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी उपस्थित होते.

Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule announces 48-hour deadline to issue certificates after 10th and 12th board results.
Indian Navy SSC Recruitment : भारतीय नौदलात अधिकारी होण्याची संधी; 254 जागा भरणार

बारावीचा निकाल जाहीर :

आज दुपारी एक वाजता मंडळाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 89.51 टक्के तर मुलींचा निकाल 94.58 टक्के लागला आहे. तर 96.74% टक्क्यांसह दरवर्षीप्रमाणेच कोकण विभाग आघाडीवर आहे. कोल्हापूर – 93.64%, मुंबई – 92.93%, संभाजीनगर – 92.24%, अमरावती – 91.43%, पुणे – 91.32%, नाशिक – 91.31%, नागपूर – 90.52%, लातूर – 89.46% अशी अन्य मंडळांची टक्केवारी राहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com