Indian Navy SSC Recruitment : भारतीय नौदलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. नौदलामध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नौदलाच्या एक्झिक्युटिव्ह, एज्युकेशन आणि टेक्निकल शाखांमधील विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या...
नौदलामध्ये काम करण्याचे अनेकांची इच्छा आणि स्वप्न असते. अशा इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नौदलामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. नौदलाच्यावतीने तब्बल 254 अधिकारी पदाच्या जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक्झिक्युटिव विभागातील जनरल सर्व्हिस (GS / XI) ची 50 पदे, पायलटची 20 पदे, नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसरची 18 पदे, एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 08 पदे, SSC लॉजिस्टिक्सची ३०, नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC)ची 10 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच नौदलाच्या एज्युकेशन शाखेमध्ये 18 जागा, तर टेक्निकल शाखेतील इंजिनिरिंग शाखेत (GS) 30, इलेक्ट्रिकल शाखेत (GS) 50 आणि नेव्हल कन्स्ट्रक्टरच्या 20 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
नौदलाच्या या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदावारीची शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. यामध्ये एक्झिक्युटिव शाखेतील पदाकरीता उमेदवार हा 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा MCA / M.Sc (IT) ही पदवी प्राप्त केलेला असावा. तर शैक्षणिक शाखेतील पदासांठी प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. शैक्षणिक अंहर्ता पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे टेक्निकल शाखेसाठी 60% गुणांसह BE/B.Tech पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही विविध पदानुसार वेगवेगळी आहे. एक्झिक्युटिव शाखेसाठी उमेदवारांचा जन्म हा 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान झालेला असावा, तर शैक्षणिक विभागातील पदासाठी 2006 पर्यंतचा जन्म असावा, तसेच टेक्निकल विभागासाठी उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा. यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी नौदलाच्या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर जाहिरात पाहावी.
नौदलाच्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी Online अर्ज करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 10 मार्च 2024 पर्यंत आहे. उमेदवारांनी या मुदतीमध्ये वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी नौदलाच्या संकेतस्थळास भेट द्यावी.(https://www.indiannavy.nic.in/)
Edited by : Rashmi Mane