ZP election update : राहिलेल्या 20 जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट : कोर्टाकडून आली सुनावणीची तारीख, कधी होऊ शकते मतदान? वाचा सविस्तर

20 ZP Election Dates : राज्यातील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा नुकताच बसला असला तरी अद्याप राज्यातील उर्वरित 20 जिल्हा परिषदेंची निवडणूक प्रक्रिया रखडली आहे.
ZP Election
ZP Election Sarkarnama
Published on
Updated on

ZP Election News : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. आरक्षणामुळे अद्यापही 20 जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. ही निवडणूक प्रक्रिया कधी सुरु होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली असतानाच याबाबत सर्वोच्च न्यायालयातून अपडेट आली आहे. या निवडणुकीसंदर्भातील पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. या सुनावणीत फेरआरक्षण काढण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

राज्यातील 32 जिल्हा परिषदेपैकी 20 जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने या 20 जिल्हा परिषदेतील निवडणूका फेरआरक्षण झाल्याशिवाय घेण्यास नकार दर्शवला होता. तर दुसरीकडे राज्यातील ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली नाही त्या 12 जिल्हा परिषद निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 7 फेब्रुवारीला मतदान झाले व 9 फेब्रुवारीला मतमोजणीही पार पडली आहे.

रखडलेल्या 20 जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. या सुनावणीत फेरआरक्षण काढण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. या तारखेला आदेश दिल्यानंतर पुढील 3 आठवड्यात फेरआरक्षण होऊ शकते. फेरआरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका मे महिन्यात होऊ शकते. त्यामुळे जवळपास तीन महिने या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.

ZP Election
Shivsena UBT : 'मुंबईतील रस्त्यांना 'टिपू'चे नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच; महापौर रितू तावडे साक्षीदार, आपल्या फायद्यासाठी त्याची कबर...' ठाकरेंचा घणाघात

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थापैकी नोव्हेंबरपासून 288 नगरपालिका व नगरपंचायतींच्या, 29 महापालिका आणि 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुका मागील 3 महिन्यात पार पडल्या आहेत. आता 20 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत कोर्टाकडून 30 मार्च रोजी स्पष्टता येणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 30 मार्च रोजी होत असलेल्या सुनावणीकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com