Maharashtra Mahapalika Election: राज्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; महिला,OBCच्या राखीव जागांबाबत आयोगाची मोठी घोषणा

Municipal Corporation 2026: गेल्या सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता याचदरम्यान,राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचाही मुहूर्त लागला आहे.
State Election Commission Mahapalika Election
State Election Commission Mahapalika Election Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता याचदरम्यान,राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचाही मुहूर्त लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (ता.15) महापालिका निवडणुकांची (Mahapalika Election) घोषणा केली आहे. यावेळी निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महिला,अनुसुचित जाती जमाती यांसह ओबीसींच्या राखीव जागांबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच अनेक महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून दुसर्या दिवशी अर्थात 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील जाहीर झालेल्या 29 महापालिकांच्या निवडणूक ही एकूण 2869 जागांसाठी असणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम घोषित झालेल्या महापालिकांच्या शहरात आता आचारसंहिता लागू करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.

निवडणुकांचा कार्यक्रम झालेल्यांमध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर,नागपूर या महापालिकांचा समावेश असणार आहे. तसेच नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी,मीरा भाईंदर, वसई विरार, पनवेल, जळगाव, धुळे, मालेगाव, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर,अमरावती, अकोल्यासह चंद्रपूर याही महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे.

State Election Commission Mahapalika Election
Raigad Politics : कमालच झाली, पोलिसांचा कडक बंदोबस्त तरीही स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडला! प्रशासनाची धावाधाव अन् गोंधळ; नेमकं काय झालं?

निवडणूक आयोगानं (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार,राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरातील 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.या महापालिकांच्या एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आयोगानं यावेळी महापालिका निवडणुकांसाठी राखीव जागांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.

State Election Commission Mahapalika Election
Nitin Nabin Net worth : 5 वेळा आमदार असूनही... भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची चकित करणारी 'नेटवर्थ'; आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

त्यात राज्यातील 29 महापालिकेच्या एकूण 2869 जागांपैकी 1 हजार 442 जागा या महिलांसाठी,341 जागा या एससी, एसटीसाठी 77 आणि ओबीसींसाठी 759 जागा राखीव असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com