

पेण तालुक्यातील तहसील कार्यालयातील अत्यंत सुरक्षित स्ट्राँग रूमचा दरवाजा अचानक उघडलेला आढळला.
सीसीटीव्ही तपासात चोरी किंवा घातपात नसून उंदराच्या हालचालीमुळे दरवाजा उघडल्याचे स्पष्ट झाले.
प्रशासनाने दिलासा व्यक्त केला असून सर्व शासकीय कागदपत्रे पूर्णतः सुरक्षित असल्याचे सांगितले.
Raigad News : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या तहसील कार्यालयाच ठेवण्यात आलेल्या EVM च्या स्ट्राँग रूमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्ट्राँग रूमचा दरवाजा अचानक उघडल्याने एकच खळबळ उडालीय. या प्रकरणानंतर आता प्रशासनाची धावाधाव सुरू झाली असून स्ट्राँग रूमचा दरवाजा अचानक कसा उघडला याचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला असून यात मानवी निष्काळजीपणा किंवा घातपात नसल्याचे समोर आले आहे.
नुकताच रायगड जिल्ह्यात नगरपालिका आणि नगपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता निकालाची प्रतिक्षा असून पेण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये पेण पालिकेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेले EVM ठेवण्यात आले आहेत. यासाठी अत्यंत सुरक्षित स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे. येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही देखील लावण्यात आले आहेत.
दरम्यान अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या स्ट्राँग रूमचा दरवाजा अचानक उघडला गेला. या अनपेक्षित घटनेने एकच खळबळ उडाली. यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तर धावपळ देखील सुरू झाली. विशेष म्हणजे महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि साहित्य असलेल्या अत्यंत सुरक्षित अशा या स्ट्राँग रूमचा दरवाजा कसा उघडला याचा शोध घेण्यात आला असून प्रशासनही सतर्क झाले आहे.
याबाबत तातडीने तपास करण्यात आला असून प्रथमदर्शनी हा प्रकार कुणी केला असेल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेलेत. पण स्ट्राँग रुमचा दरवाजा चोराने उघडला असावा? अशी येथे चर्चा सुरू असतानाच याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे पेण शहरातील नागरिकांमध्ये शंका-कुशंका पसरल्या गेल्या. यावेळी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
यासर्व घटनाक्रमानंतर तहसीलदार तानाजी शेजाल यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेवून तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर स्ट्राँग रुमचा दरवाज्याजवळ एक उंदीर फिरताना दिसून आला.
तर दरवाजाच्या खालच्या बाजूला असलेल्या यंत्रणेशी उंदराचा संपर्क झाल्यानेच तो दरवाजा उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही घटना मानवी निष्काळजीपणा किंवा घातपातामुळे घडलेली नसून उंदराच्या हालचालीमुळेच घडल्याचे समोर आले आहे. यामुळे पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच सत्य समोर आल्याने देखील प्रशासनाची विश्वासार्हता कायम राहिली आहे.
1. पेण तहसील स्ट्राँग रूमचा दरवाजा उघडला कसा?
➡️ सीसीटीव्ही फुटेजनुसार उंदराचा दरवाज्याच्या यंत्रणेशी संपर्क झाल्यामुळे दरवाजा उघडला.
2. या घटनेत चोरी झाली का?
➡️ नाही, कोणतीही चोरी किंवा कागदपत्रांची छेडछाड झालेली नाही.
3. प्रशासनाने तपास कसा केला?
➡️ तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून संपूर्ण घटनेचा उलगडा करण्यात आला.
4. ही घटना मानवी निष्काळजीपणामुळे घडली का?
➡️ नाही, मानवी चूक किंवा घातपात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
5. पुढील काळात काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?
➡️ स्ट्राँग रूम परिसरात उंदीर प्रतिबंधक उपाय आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.