India–Pakistan War Live : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक संपली

Pahalgam Terror Attack : अखेर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे. रात्रभरात भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडले आहेत. त्यामुळे पाकच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे. भारत पाकिस्तान युद्धाची प्रत्येक अपडेट जाणून घेऊया.
viral video showing a Pakistani MP calling Prime Minister Shehbaz Sharif "coward" amid rising India-Pakistan war tensions.
viral video showing a Pakistani MP calling Prime Minister Shehbaz Sharif "coward" amid rising India-Pakistan war tensions.Sarkarnama
Published on
Updated on

अनेक  ठिकाणी ब्लॅकआउट

पाकिस्तानकडून हल्ले सुरू असताना, जम्मू-काश्मीर, गुजरातमधील कच्छ आणि पंजाबमधील होशियारपूरसह अन्य भागात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आळं आहे.

भारताने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले

भारताने फेरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले आहेत. जम्मू एअरपोर्ट परिसरात स्फोटांचे आवाज.

पाकिस्तानकडून सीमावर्ती गोळीबार सुरूच

पाकिस्तानकडून पुंछ, उरी, कुपवाडा भागात गोळीबार सुरू आहे. भारताकडूही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

Gujarat Pakistan Border War : गुजरातच्या सीमावर्ती भागातील 18 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; भूज विमानतळ लष्करानं घेतलं ताब्यात

पाकिस्तानच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, गुजरातच्या सीमावर्ती भागातील 18 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्टवर आहेत. भूज विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले आहे. बनासकांठा, कच्छ आणि पाटणच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये आज शुक्रवारी देखील रात्री ब्लॅकआउट करण्यात आले.

Arun Jaitley Stadium Received Bomb Threat : दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमला उडवून टाकण्याची धमकी देणारा 'ई-मेल'नं खळबळ

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमला उडवून टाकू, असा धमकी देणारा ई-मेल दिल्ली क्रिकेट असोसिएशनला आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असतानाच, हा मेल आल्यानं डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एका अज्ञात ई-मेल आयडीवरून अरूण जेटली स्टेडियमला बॉम्बने उडवू, अशी धमकी देणारा हा मेल आहे.

India Pakistan Situation : उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा गोळीबार सुरू; पतंप्रधान मोदींची तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक

उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक झाली. या बैठकीत पुढची रणनीती ठरवण्यात आली आहे.

India Pakistan Tension : सैन्याच्या तयारीचे, गतिविधीचे चित्रिकरण व्हायरल करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हा नोंदवले जाणार

राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.

Gujarat Government : गुजरात सरकारने राज्यात 15 मे रोजीपर्यंत ड्रोन आणि फटाके फोडण्यावर घातली पूर्ण बंदी

गुजरात सरकारने राज्यात 15 मे रोजी पर्यंत ड्रोन आणि फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

India Pakistan War Situation : पाकिस्तनाचा मोठा डाव उधळला; भारतातील 15 शहरांमधील लष्करी तळ होते निशाण्यावर

पाकिस्तानचा काल रात्री ड्रोन हल्ल्यामागे मोठा डाव होता, हे आता उघड होऊ लागलं आहे. भारतातील 15 शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. पण भारताच्या एस-400 हवाई संरक्षण यंत्रणेने ते हाणून पाडला.

India Pakistan War : पाकिस्तानचा 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न; कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरवर बोलताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले. त्याने 36 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने मोठ्या शस्त्रांनी भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. जम्मूमधील तंगधर, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, उधमपूर येथे ड्रोन हल्ले केले. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा हल्ला हाणून पाडला.

India Vs Pakistan Live : पाकिस्तानचेही मोठे नुकसान

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामध्ये पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये काही भारतीय सैनिकही जखमी झाले आहेत. पुंछमधील गुरूद्वारावर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. पाकिस्ताने त्यांच्या नागरिकांनाही संकटात टाकले. लाहोर ते कराची विमानसेवा सुरू ठेवली होती. काही ड्रोनचा वापर रेकीसाठी केल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

India Vs Pakistan Live : पाककडून ३०० ते ४०० ड्रोनने हल्ला

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद सुरू असून यामध्ये पाकिस्ताने ता. ८ ते ९ मेच्या रात्री ३०० ते ४०० ड्रोनद्वारे हल्ला केल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाककडून ३६ ठिकाणी ड्रोन डागण्यात आली. हे ड्रोन तुर्कीची असल्याचे प्राथमिक तपासा समोर आल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Prakash Ambedkar News : वाढदिवस साजरा करू नका

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांंनी म्हटले आहे की, उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी तो साजरा करू नका. केक कापू नका, फटाके फोडू नका. त्याऐवजी रक्तदान शिबीरांचे आयोजन करा. भारतीय सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी तिरंगा रॅली काढा आणि भारत झिंदाबादचे नारे द्या, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

Maharashtra on Alert : राज्य सरकार अलर्ट 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देण्यात आला.

India Vs Pakistan Update : गुजरातमध्ये फटाक्यांना बंदी

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात १५ मे पर्यंत फटाके आणि ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. गुजरात सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे गुजरातमधील सीमाभागातही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

INd Vs Pak : सिद्धीविनायक, साईबाबांचे मंदिरही अलर्ट मोडवर; हार फुलांचेही होणार स्कॅन

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबरोबरच आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिरही अलर्ट मोडवर आलेले आहे. या दोन्ही मंदिरातील हार आणि फुलांचेही स्कॅन करण्यात येणार आहेत. मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तूंना सक्तीची बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व मंदिरांनाही अलर्ट देण्यात आलेला आहे.

IPL : आयपीएल काही काळासाठी स्थगित

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती इंडियन प्रीमियर लीग काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. थोड्याच दिवसांत याबाबतचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

INd Vs Pak : मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी होते

पाकिस्तानकडून सीमेवर करण्यात आलेल्या गोळीबारात मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी असलेले जवान मुरली नाईक हे शहीद झाले आहेत. नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील आहेत. ते घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये राहत होते. पाकिस्तानकडून आज सकाळी जम्मू परिसरात झालेल्या हल्ल्यात मुरली नाईक हे शहीद झाले आहेत. मुरली नाईक यांच्या हौतात्म्युळे कामराज नगरमध्ये शोककळा पसरली आहे.

पाकिस्तानचे मनसुबे भारताच्या लष्कराने उधळले : उमर अब्दुला

पाकिस्तानकडून जम्मू शहरात ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या लष्कारांनी सर्व ड्रोन निकामी करत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री नऊ वाजता आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्तानकडून हल्ले झाले आहेत. पाकिस्तानने थोड्या अकलहुशारीने निर्णय घेतले पाहिजेत, असे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी सांगितले.

Ind Vs Pak : भारत-पाक युद्धाची आज सायंकाळी परराष्ट्र मंत्रालय देणार माहिती

‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार घेणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केले आहेत. त्यानंतरही पकिस्तानमधील महत्वपूर्ण ठिकाणांवर भारताकडून क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. त्याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेतून मिळणार आहे.

राजनाथ सिंहांनी घेतली लष्कराच्या तीनही प्रमुखांची बैठक

भारत-पाकिस्तानाच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज आपला लखनौ दौरा पुढे ढकलला आहे. राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा तीनही दलाच्या लष्करप्रमुखांसोबत बैठक घेतली आहे.

Ajit Pawar live: अजितदादांनी  हेलिकॉप्टरने जाणे टाळलं 

भारत-पाकिस्तानच्या तणावामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यास नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हेलिकॉप्टरने मुंबईला जाणे टाळले असल्याचे समजते. साताऱ्यावरुन ते मुंबईकडे गाडीने रवाना झाले आहेत.

India Pakistan Conflict Live: RSS कडून केंद्र सरकार आणि लष्कराच अभिनंदन

भारताने पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र सरकार आणि लष्कराचे अभिनंदन करण्यात आले आहे. याबाबत आरएसएसकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदुर यशस्वी राबवल्याबद्दल आरएसएसने कौतुक केले आहे. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले, असे निवेदनात म्हटलं आहे.

India-Pakistan Conflict Live: महाराष्ट्र सरकारची तातडीची बैठक

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे साताऱ्याहून बैठकीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणत्याही उणिवा राहणार नाहीत याचा आढावा सरकार घेणार आहे.

भारत-पाक तणाव आयपीएलचे सामने स्थगित

भारत-पाक तणाव आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले आहेत. गुरुवारी सुरू असलेल्या पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना अचानक थांबण्यात आला होता. हा सामना रद्द करताना दोन्ही संघालांना एक एक गुण देण्यात आले होते. आता आयपीएलमधील पुढील सामने स्थगित करण्यात आले आहेत.

: संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलवली आहे. त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबच बैठक ठेवली आहे. सध्याच्या परिस्थितीवर त्यांची सैन्यदलाच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याने खळबळ

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली माहिती, सकाळी सव्वा पाच वाजता साकीनाक्यातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्यावर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती.ड्रोन त्यानंतर झोपडपट्टी परिसरात नाहीसा झाल्याचा कॉलरचा दावा . ड्रोन उडवणाऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू

सीए फायनल, इंटरमीडिएट, पीक्यूसी परीक्षा पुढे ढकलल्या

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडिया कडून मोठी घोषणा देशातील तणावपूर्ण सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सीए फायनल, इंटरमीडिएट आणि पीक्यूसी परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय. ९ मे २०२५ ते १४ मे २०२५ या काळात होणारे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा

पाकिस्तानला मदत देण्यासाठी आज आयएमएफची बैठक

पाकिस्तानला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची (IMF) आज बैठक होणार आहे. पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या १.३ अब्ज डॉलर निधिला मान्यता देण्यावर आज होणार चर्चा. मात्र पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या निधीला भारताकडून केला जाणार प्रखर विरोध.

पाकिस्तानची आर्थिक मदतीसाठी याचना, कर्जासाठी विनंती

भारताच्या मोठ्या कारवाईनंतर पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे कर्जासाठी पसरले हात. या काळात पाकिस्तानला अधिक कर्ज देण्याच केलं आवाहन केले. वाढत्या युद्ध आणि साठ्यातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मतदीच आवाहन केले.

Delhi : दिल्लीतील महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महत्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल किल्ला, कुतुब मिनार परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करूनच आता प्रवेश दिला जात आहे.

India-Pakistan War : मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्वाची बैठक पार पडली. नौदलाची ठिकाणं संवेदनशील ठिकाणी मच्छिमरांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या आदेश देण्यात आले आहेत. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. पाकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेण्यात आल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. २६/११ प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. सीडीएस अनिल चौहान हे या बैठकीस उपस्थित राहणार असून भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती नेमकी काय असेल याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

भारतीय लष्कराकडून लाहोरमधील महत्वाची ठिकाणं लक्ष्य

पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्यानंचर भारतीय लष्कराने लाहोरमधील महत्वाची ठिकाणं लक्ष्य केली. यामध्ये सियालकोट शहराचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात वाहनांचे नुकसान

जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती शहरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात वाहने आणि दुकानांचे नुकसान झाले.

उरी, कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पहाटे पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आला. उरी, कुपवाडा, नौशेरा या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

India-Pakistan War : पाकिस्तानकडून एलओसीवर रात्रभर गोळीबार

जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानने जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर हा गोळीबार करण्यात आला आहे.

India-Pakistan War : भारताने थेट इस्लामाबादलाच केलं लक्ष्य

भारताने थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादलाच टार्गेट केलं आहे. ड्रोन आणि हवाई हल्ले करत भारताने रात्रभर पाकिस्तानची झोप उडवली आह. स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबादमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामाबादसह लाहोर आणि पेशावर येथेही भारतीय लष्कराने हल्ले केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com