कृषिमंत्र्यांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा गनिमी कावा! पाहणी न करतानाच जाणाऱ्यां भरणेंना ठाकरेंचा शिलेदार भिडला, गुन्हा दाखल

Minister Bharne Faces Shivsena Protest : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना हिंगोलीत शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत अडवण्याचा प्रयत्न झाला.
Dattatray Bharane
Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे गेले.

  2. त्यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न केला.

  3. घटनेमुळे हिंगोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

Hingoli News : राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा पावसाचे थैमान घातले असून हजारो हेक्टर शेती पावसामुळे बाधीत झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशात शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. मात्र वाशिम ते नांदेड असा दौऱ्या करणाऱ्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना हिंगोलीतील शेतकऱ्यांची विचारपूस देखील करावी वाटली नाही. यामुळे शेतकऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी थेट कृषिमंत्र्यांवर गनिमी कावा करत ताफा अडवला. यामुळेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसाची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी यानंतर शिवसैनिकांची धरपकड केली. तसेच ठाकरे गटाच्या 5 पदाधिकाऱ्यांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोलीत मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे पिके वाहून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जामुळे शेतकरी चिंतेत आला असून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र अद्याप यावरून कोणतीच कारवाई राज्य सरकारने केलेली नाही. यामुळे राज्यभर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.

अशातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना संतापलेल्या शेतकरी आणि शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. वाशिम जिल्ह्याचा दौरा करून नांदेडच्या दिशेनं जाणाऱ्या कृषिमंत्र्यांचा ताफा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवला. तसेच काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

Dattatray Bharane
Dattatray Bharane News : शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा होणार; कृषिमंत्र्यांनी सांगितली तारीख

यावेळी शिवसेनेचे नेते वशिम देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी न करता जाणाऱ्या मंत्र्याला धडा शिकवला असा जोरदार टोला भरणे यांना लगावला. त्यांनी राज्याचा कृषिमंत्री जिल्ह्यातून जात आहे. मात्र त्यांना साधं रस्त्यावर उतरून एखाद्या शेतात जावं वाटतं नाही. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7 लोक मृत्यूमुखी पडली. 2 लाख 75 हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र मायबाप सरकार असो किंवा कृषिमंत्री यांना याबाबत काहीच वाटत नसल्याचा आरोप देखील यावेळी देशमुख यांनी केला आहे.

तसेच सध्या जे काही सरकारचे दौरे सुरू आहेत. ते थांबवून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा. अन्यथा आता फक्त काळे झेंडे दाखवले आहेत. उद्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराच देशमुख यांनी दिला आहे.

Dattatray Bharane
Dattatray Bharane News : क्रीडा, अल्पसंख्यांक खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, आता..! नवे कृषिमंत्री भरणे थेट मुद्द्यावरच आले...

FAQs :

1. दत्तात्रय भरणे कोण आहेत?
ते महाराष्ट्राचे कृषिमंत्री आहेत.

2. हिंगोलीत काय घडलं?
शेतकरी आणि शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला.

3. आंदोलनामागे कोण होते?
शिवसैनिक आणि स्थानिक शेतकरी.

4. आंदोलनाचे कारण काय होते?
शेतकऱ्यांच्या समस्या व कृषीविषयक असंतोष.

5. या घटनेचा परिणाम काय झाला?
हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com