Dattatray Bharane News : क्रीडा, अल्पसंख्यांक खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, आता..! नवे कृषिमंत्री भरणे थेट मुद्द्यावरच आले...

Dattatray Bharne’s Statement After Becoming Agriculture Ministerदत्तात्रय भरणे यांच्या या विधानामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही माणिकराव कोकाटे यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला होता.
Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कृषिमंत्री पद आणि वाद हे गेल्या काही दिवसांपासून समीकरणच बनले आहे. कृषिमंत्री पद आलं की तो माणूस अडचणीत सापडतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही काळापासून सुरू आहेत. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर नव्या महायुती सरकारमध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषिमंत्री पद आलं, मात्र सुरुवातीपासूनच आपल्या विधानांमुळे माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळालं.

सभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना हे पद सोडावं लागलं. त्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्याकडे हे पद देण्यात आले आहे. कृषिमंत्रिपद भरणे यांच्याकडे आल्यानंतर आता त्यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

इंदापूर मधील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘क्रीडा व अल्पसंख्यांक खात्याचे बरं होतं. लय त्रास नव्हता आता त्रास घ्यावाच लागेल.’ या विधानामुळे आपण अडचणीत येऊ शकतो, असं लक्षात येताच लगेच भरणे यांनी सारवासारव करत "आता हा त्रास नाही म्हणता येणार ही जबाबदारी आहे," असं सांगितलं.

Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
SC Reservation : मोठी बातमी : महाराष्ट्रात SC आरक्षणात उपवर्गीकरण लागू? ‘वंचित’च्या दाव्याने खळबळ

इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधणे या कामाच्या भूमिपूजन समारंभात कृषिमंत्री भरणे बोलत होते. भरणे त्यांच्या भाषणात म्हणाले, "परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मराठवाड्यात होतो, त्यामुळे जरा पळावे लागते, फिरावे लागते. क्रीडा व अल्पसंख्याक खातं बरं होतं, लय त्रास नव्हता पण आता त्रास घ्यावाच लागेल."

Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
NDA Vs Congress : 'एनडीए'ची सत्ता गेली, काँग्रेसचे निवडून आलेले सर्व 23 आमदार बनले मंत्री; महिला नेत्यानं उलटवला होता डाव

भरणे यांनी लगेच सारवासारव करीत म्हणाले, "पण हा त्रास नाही ही जबाबदारी आहे. आपल्या नेत्यांनी विश्वास टाकलेला आहे."भरणे यांच्या या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.क्रीडा व अल्पसंख्यांक खात बरं होतं, लय त्रास नव्हता, याचा अर्थ आता कृषिमंत्री झाल्यावरती खूप त्रास आहे असेच त्यांना सांगायचं होतं का? त्यामुळे भरणे यांना कृषिमंत्री पद हे झेपत नाही की काय? असाच प्रश्न आता निर्माण होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com