Bachchu Kadu : हुकूमत ‘प्रहार’चीच असणार; बच्चू कडू यांचे सूचक विधान

Ahilyanagar Newasa Constituency Bachchu Kadu MVA mahayuti Shankarrao Gadakh : अहिल्यानगर इथल्या नेवासा मतदारसंघात सभा घेत बच्चू कडू यांनी राज्यातील सत्तेत प्रहार जनशक्ती कोणत्या भूमिकेत असेल, यावर मोठं विधान केले.
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : नेवाशातील भाजपशी बंडखोरी करत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघात त्यांनी शिवसेनायुबीटी पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे यांना आव्हान उभं केले आहे.

बच्चू कडू यांनी नेवाशात घेतलेल्या महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. 'राज्यात सरकार कोणाचेही असो, पण 'हुकूमत' प्रहारची चालेल', असा इशारा बच्चू कडू यांनी दिली. छत्रपती संभाजीराजे, बच्च कडू आणि राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी राज्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. ही तिसरी आघाडी निवडणुकीत काय करिष्मा करते, याकडे लक्ष लागले आहे.

Bachchu Kadu
MP Supriya Sule : संगत लय वाईट, देवाभाऊ त्यातूनच बिघडले; खासदार सुळेंचा अजितदादांना टोला

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "आम्ही सत्तेत असो किंवा नसो, पण 'हुकूमत' आमचीच असते. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे उदाहरण दिले. देवेगौडा यांच्याप्रमाणे उमेदवार कमी निवडून आले, तरी 'हुकूमत' त्यांचीच होती. तशीच यावेळी 'हुकूमत' आमचीच असणार आहे".

Bachchu Kadu
Uddhav Thackeray : महिलांचा अपमान करणाऱ्या आमदाराच्या प्रचारासाठी PM मोदी आले; उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून सुनावले... पाहा VIDEO

शिवसेनायुबीटी पक्षाचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, "गडाख यांना ज्या 'बॅट'ने निवडून आणले, तीच 'प्रहार'ची 'बॅट' गडाखांना गायब करेल. शेतकऱ्यांना कमी भाव देणाऱ्या आणि शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांचा यावेळी पराभव निश्चित आहे".

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांना आव्हान देत, शेतकऱ्याांचे प्रतिटन कमी केलेले पाचशे रुपये देणार असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान दिले. गडाख यांनी मंत्रिपदाचा वापर जिरवाजिरवीसाठी केला. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेतल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com