Ravindra Waikar : धडधड वाढली! वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता

Mumbai North West Lok Sabha Verdict: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात (High Court) पोचला होता. वायकर यांच्या विजयाला अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कीर्तीकर हे मतमोजणीत पुढे होते.पण फेरमतमोजणीत त्यांचा धक्कादायकरित्या अवघ्या 48 मतांनी त्यांचा पराभव झाला.
Ravindra Waikar | Amol Kirtikar
Ravindra Waikar | Amol KirtikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यात मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात थेट लढत झाली होती. या लढतीत रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी निसटता विजय झाला होता. पण हा त्यांचा विजय वादात सापडला असून या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे वायकरांची खासदारकी राहणार की जाणार याचा निर्णय कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायकरांसह त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे.

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात (High Court) पोचला होता. वायकर यांच्या विजयाला अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कीर्तीकर हे मतमोजणीत पुढे होते.पण फेरमतमोजणीत त्यांचा धक्कादायकरित्या अवघ्या 48 मतांनी त्यांचा पराभव झाला.

Ravindra Waikar | Amol Kirtikar
Mangesh Chivate : एकनाथ शिंदेंच्या विश्वासूला सीएम फडणवीसांनी हटवलं, पत्र लिहून म्हटले, 'एकही दिवस सुट्टी नाही...'

कीर्तीकर यांनी मतमोजणीत गडबड झाली असल्याचा आरोप करत वायकरांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असून,पण निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. गुरुवारी (ता.12) याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

Ravindra Waikar | Amol Kirtikar
MP Bajrang Sonawane Meet Amit Shah: संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच पवारांच्या खासदारानं घेतली तडकाफडकी अमित शाहांची भेट

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीबाबत मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. अमोल कीर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली. त्यात ते एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. मात्र,फेरमतमोजणीत अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com