Rahul Gandhi Politics: बालेकिल्ल्यात राहुल गांधी गरजले, मोदींना आव्हान देत आदिवासींना जिंकले!

Rahul Gandhi; Prime Minister Narendra Modi not respect constitution, insulting tribals-काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार शहरात गुरुवारी राहुल गांधींनी संविधानाच्या प्रश्नावर नरेंद्र मोदींना दिले आव्हान
PM Narendra Modi & Rahul Gandh
PM Narendra Modi & Rahul GandhSarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024: नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपच्या हाती गेलेला हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करीत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यासाठी गुरुवारी जोरदार बॅटिंग केली.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चार मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची काल सभा झाली. सभेच्या मैदाना शेजारीच हेलिपॅड होते. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांचे हेलिकॉप्टर पाहण्यासाठीही सभेएवढीच गर्दी झाली होती.

PM Narendra Modi & Rahul Gandh
Rohit Pawar : भाजप नेत्यांची भाषा घसरली, आमदार पवारांनी टायमिंग साधलं अन् VIDEO शेअर केला

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप सत्तेत हवा आहे. ते होऊ देऊ नका. सध्याच्या राज्यातील सरकारने अनेक उद्योग शेजारच्या राज्यात पाठवले. त्यामुळे पाच लाख तरुणांचा रोजगार गेला. सरकारचे काम नोकऱ्या देणे असते. राज्यातील सरकारने मात्र तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले.

PM Narendra Modi & Rahul Gandh
Mallikarjun kharge VIDEO : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेचे व्यासपीठ कोसळले; दोन जण जखमी

काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते या देशातील संविधानाच्या संरक्षणासाठी लढत आहेत. मी प्रत्येक सभेत संविधान घेऊनच भाषण करतो. ते संविधान काय आहे, हे नरेंद्र मोदी यांना माहीतच नाही. त्यामुळे ते संविधानाला लाल पुस्तक म्हणतात. रिकामे खोके म्हणतात. पंतप्रधान मोदी तसे म्हणणारच, कारण हा विचारधारेचा लढा आहे. आम्ही संवैधानाला सर्वोच्च मानतो. ते मात्र संविधानाला खोके म्हणतात. यावरून त्यांची विचारधारा काय आहे, हे स्पष्ट होते. संविधानानुसारच देश चालला पाहिजे. त्यासाठी आपण सगळे जागरूक होऊन काम करू.

देशात आठ टक्के आदिवासी आहेत. या समाजाला प्रत्येक संधी पासून वंचित ठेवले जाते. आठ टक्के आदिवासींचे प्रतिनिधित्व कोणत्याही क्षेत्रात दिसत नाही. त्यांना आपला अधिकार मिळवावा लागेल. त्यासाठी काँग्रेस पक्षाचा लढा सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष आदिवासींना वनवासी म्हणतो. त्यामागे त्यांचे मोठे षडयंत्र आहे. यातून त्यांना आदिवासींचा अधिकार काढून घ्यायचा आहे. आदिवासी हे आदिवासीच आहेत. त्यांना त्याच नावाने संबोधले जावे. या देशातील जल, जंगल आणि जमीन यावर त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी आपल्याला पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरू असलेले आपल्या अधिकारावरील आक्रमण ठोकवावे लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार निवडून आला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस नंदुरबार पासून करीत होते. मध्यंतरी त्याकडे दुर्लक्ष झाले. आता राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरून नंदुरबारच्या आदिवासी मतदारांना आपल्या जोरदार आणि आक्रमक शैलीने पुन्हा आपलेसे केले. सभेला उपस्थित नागरिकांनी राहुल गांधी यांना प्रतिसाद दिला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com