Maharashtra Exit Poll 2024 : एक्झिट पोलनुसार महायुतीला सत्ता, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार?

Exit polls indicate Mahayuti majority in Maharashtra: एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सरासरी 40 ते 50 च्या दरम्यान जागा एक्झिट पोलमध्ये दाखवत आहे. तर, भाजपला सरासरी 75 ते 90 जागा मिळण्याची शक्यता च्या दरम्यान जागा दाखवत आहे.
DCM Devendra Fadnavis
DCM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एक्झिट पोलनुसार महायुतीची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सरासरी 40 ते 50 च्या दरम्यान जागा एक्झिट पोलमध्ये दाखवत आहे. तर, भाजपला 75 ते 90 च्या दरम्यान जागा दाखवत आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रि‍पदावरील दावा मजबूत होतो आहे.

DCM Devendra Fadnavis
Maharashtra Vidhanasbha Election: मविआ, महायुतीत रस्सीखेच ! विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर?

एलेक्ट्रोरल एजच्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून भाजपला 78 जागा दर्शवत आहे. तर, चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार भाजपला 90 पेक्षा अधिक जागा मिळत आहेत. तर मॅट्रिझनुसार भाजपला 89 ते 101 जागा मिळत आहे.

एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महायुतीमध्ये सत्तेत परत येत असताना भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतो आहे. महायुती निवडणुकीला समोर जात असताना त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित केला नव्हता.

फडणवीस सरसंघचालकांना भेटले

एक्झिट पोल महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडूण येणार असल्याचे सांगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून संघातून पुन्हा फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी समोर केले जाणार असल्याचा तर्क लावल्या जात आहे.

DCM Devendra Fadnavis
Solapur Voting : सोलापुरात ‘लाडक्या बहिणी’ ठरवणार आठ मतदारसंघांचे आमदार; जिल्ह्यात 12 लाख महिलांचे विधानसभेसाठी मतदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com