Vidhanasbha Election News : मविआ, महायुतीत रस्सीखेच ! विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर?

Political News : गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेली महाराष्ट्र विधानसभेसाठीची रणधुमाळी बुधवारी संपली. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Mahavikas Aghadi Vs Mahayuti Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेली महाराष्ट्र विधानसभेसाठीची रणधुमाळी बुधवारी संपली. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. 23 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. राज्यातील विधानसभेच्या 288 जागासाठी चुरशीने मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 66 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आकडेवारी रात्री उशिरापर्यंत आणखीन वाढू शकते. (Vidhanasbha Election News)

2019 च्या निवडणुकीत राज्यात जवळपास 61.65 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत वाढलेली मताची टक्केवारी महाविकास आघाडी की महायुती (Mahayuti) कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मतदान संपल्यानंतर विविध एजन्सीजचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला मिळणाऱ्या जागांमध्ये फारसा फरक नसेल. त्यामुळे दोघांना सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते, असा अंदाज आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Vinod Tawde : विनोद तावडेंनी मानले शरद पवारांचे आभार, नेमकं कारण काय?

राज्यातील मतांची ही आकडेवारी 2019 च्या तुलनेत वाढलेली आहे. या विधानसभा निवडणुकीत पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या सभा झाल्या. या सर्वच प्रमुख नेत्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. मात्र, ही गर्दी मतात रूपांतर करण्यात कोण यशस्वी होतात? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Vinod Tawde on Rahul Gandhi : विनोद तावडेंकडून राहुल गांधींना आव्हान; म्हणाले, नालासोपाऱ्यात या...

या निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजना, बेरोजगाराचे प्रश्न, शेतकऱ्यांना मदत, कर्ज माफी, मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावरून ही निवडणूक गाजली. महायुती व महाविकास आघाडीच्या वतीने यावर आश्वासने देण्यात आली. राज्यातील पक्ष फुटीच्या निर्णयानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडले. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व पार्शवभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Vidhansabha Election Voting : मतदानाच्या दिवशीच उमेदवार अन् मतदाराचा मृत्यू ; तर अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटका!

गेल्या 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हा वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढलेली मताची टक्केवारी ही सत्ताधारी पक्षासाठी धोक्याची घंटा समजली जाते. मात्र, गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी व महायुती ही दोन्ही पक्ष अडीच-अडीच वर्ष सत्तेत होती. त्यामुळे नेमका फटका कोणाला बसणार ? हे निकालानंतरच समजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

Mahavikas Aghadi Vs Mahayuti
Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीत बिघाडीची चिन्हं ; 'RJD'ने जागा वाटपावर नाराजी दर्शवत घेतली मोठी भूमिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com