Satara Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अजून आठ दिवस बाकी आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघात खंडाळा तालुक्यात महामार्गाशेजारीच सातारा लोकसभेचे Satara Lok Sabha राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा भला मोठा बॅनर झळकला आहे. सध्या या बॅनरची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. विजयी झाल्या बद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन असा मजकूर या बॅनवर आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली. त्यासाठी 13 व्या यादीची वाट पहावी लागली. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्यात चुरशीची लढत झाली. मतदानानंतर या दोघांपैकी कोण निवडून येणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत.
तुतारी की कमळ अशी चर्चा रंगली असतानाच खंडाळा तालुक्यात शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा एक भला मोठा बॅनर झळकला. निकालापूर्वीच महामार्गाच्या शेजारीच लावलेला हा बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गुलाल आपलाच....शशिकांत शिंदे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे या बॅनरवर लिहिले आहे. हा बॅनर खंडाळा तालुका शशिकांत शिंदे समर्थक यांनी लावला आहे. या बॅनरची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.लोकसभा निकालाला अजून आठ दिवस बाकी असतानाच या बॅनरमुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातारा लोकसभेत आपलाच उमेदवार विजयी होणार असा छातीठोकपणे दावा केला जातो आहे. त्यासाठी कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती लीड मिळणार याची आकडेवारी देखील कार्यकर्ते सांगत आहेत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.