MNS News Video : शिवाजी पार्कवर परवानगी मिळूनही राज ठाकरेंची सभा रद्द, दिले 'हे' कारण

Maharashtra Assembly Election Raj Thackeray Rally cancelled : शिवाजीपार्कवर कार्यक्रम, सभा घेण्यासाठी सदा सरवणकर यांच्याकडून देखील महापालिकडे परवानगी मागण्यात आली होती.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये चुरस होती. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन असल्याने शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही होता. मात्र, या मैदानात सभा घेण्यास मनसेला परवानगी देण्यात आली. पण मनसेने मैदान घेण्यास नकार देत येथे होणारी सभा रद्द केली.

मनसेच्या प्रचारासाची सांगता सभा राज ठाकरे शिवाजीपार्कवर घेणार होते. त्यासाठी मनसेकडून महापालिकेकडे मैदान मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, महिनाभरआधी अर्ज करूनही आत्ता सभेसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, येवढ्या कमी कालावधीमध्ये सभे घेणे शक्य नसल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले.

Raj Thackeray
Rahul Gandhi helicopter Stuck : राहुल गांधींचं हेलिकॉप्टर झारखंडमध्ये अडकलं, अन् संतापलेल्या काँग्रेसने आरोप करत म्हटलं...

कमी कलावधीमध्ये सभेची तयारी करता येत नसल्याने मनसेकडून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या दिवशी राज ठाकरे हे उमेदवारांच्या भेटीगाठी घेतील, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाजीपार्कवर सभा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील उत्सुक होती.

सदा सरवणकर यांनी परवानगी

शिवाजीपार्कवर कार्यक्रम, सभा घेण्यासाठी सदा सरवणकर यांच्याकडून देखील महापालिकडे परवानगी मागण्यात आली होती. सरवणकर यांना 16 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर सभा, कार्यक्रम घेता येणार आहे. तशी परवानगी महापालिकेकडून देण्यात आली आहे.

बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी

17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे त्या दिवशी शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक, नेते, पदाधिकारी गर्दी करत असतात. त्यामुळे मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेकडून या दिवशी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Raj Thackeray
Sharad Pawar : शरद पवारांच्या बहिणीचा पक्का निश्चय! मला मुश्रीफांना पाडायचंय; भाऊ राज्यभर फिरत असताना मी घरी कशी बसू?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com