Congress Politics : विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आक्रमक प्रचार केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे आपल्या सभांमधून काँग्रेसला टार्गेट करत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यासाठी काँग्रेसची विशेष रणनीती आखल्याची माहिती आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे सभा घेत वेगवेगळ्या मुद्यावरून महायुतीला घेरणार आहेत. भाजपच्या बटेंगे तो कटेंगेच्या मुद्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उत्तर देणार आहेत.
राज्यातील दलित आणि मुस्लिम समाजाची मतं सोबत घेण्यासाठी खर्गे बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्याला आक्रमकपणे विरोध करणार आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल गांधी महायुतीला घेरणार आहेत. आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची मर्यादा ओलांडणे हाच पर्याय असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांच्याकडून वारंवार मांडला जाणार आहे.
काँग्रेसने महिलांसाठी दरमहा तीन हजार रुपये महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. तसेच महिलांना एसटीतून प्रवास देखील मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या योजना प्रियंका गांधी समजावून सांगणार आहेत.काँग्रेसशाशीत इतर राज्यात सुरु असलेल्या योजना आणि त्याचा फायदा यावर प्रियंका गांधी यांचा फोकस असणार.
भाजपकडून काँग्रेस ज्या घोषणा करते त्याची अंमलबजावणी करत नाही, असा प्रचार केला जातोय. कर्नाटक, हिमाचल, तेलंगणामध्ये काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. भाजपचा हा प्रचार आक्रमकपणे काँग्रेसकडून खोडून काढण्यात येत आहे. मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेस कर्नाटक, तेलंगणामध्ये राबवत असलेल्या योजनांवर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी देखील सादर करत आहेत.भाजपच्या नेत्यांकडून ज्या प्रकारे एक एक मुद्दा घेऊन प्रचार केला जातो त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.