Raj Thackeray on Dilip Lande : राज ठाकरेंचा चांदिवलीतील सभेतून शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडेंवर जोरदार प्रहार, म्हणाले...

Raj Thackeray Chandivali Rally News : ...ही अशी विकली जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.
Raj Thackeray on Dilip Lande
Raj Thackeray on Dilip LandeSarkarnama
Published on
Updated on

MNS and Chandivali Vidhansabha Election : चांदिवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज चांदिवलीत प्रचारसभा झाली. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महेंद्र भानुशाली यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार दिलीप लांडे हे रिंगणात आहेत. याशिवाय महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसने मोहम्मद आरीफ नसीम खान यांना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी आज प्रचारसभा घेत प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप लांडे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

राज ठाकरे(Raj Thackeray) भाषणात म्हणाले, 'महेंद्र भानुशालीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मी या मतदारसंघात तुमच्यासाठी पुन्हा नक्कीच सभा देईन, हा माझा शब्द आहे. इथे आज आमचा महिंद्र उभा आहे आणि इथे अजून दोन लांडे उभे आहेत. नाही एक लांड्या उभा आहे. दोन का एक? त्यातला एकतर गद्दार. म्हणजे हरामखोर शब्द हा पण कमी पडेल. या लोकांना काय नाही दिलं आम्ही? नगरसेवक झाले. महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटी मध्ये बसले. चार-चार वर्ष बसले बाकीच्यांना संधी दिली पाहीजे म्हणून बाजूला केल्यावरती हा माणूस शिवसेनेकडे विकला गेला आणि कोणत्या वेळेला विकला गेला? हे सहा नगरसेवक घेऊन विकला गेला, ज्यावेळी माझा मुलगा रुग्णालयात होता.'

तसेच 'मी त्यावेळी त्या अख्ख्या गोष्टीतून जात होतो. त्यावेळेला हा माणूस पैसे घेऊन हा लांड्या तिकडे विकला गेला तर विकला गेलाच. मग त्यांनी आमदारकी दिली मग हा आमदार झाला आणि त्याच्यानंतर दुसरीकडे विकला गेला. हा इथून तिथे विकला जातो, तिथून हा इथे विकला जातो. ही अशी विकली जाणारी लोक तुम्हाला हवी आहेत? कोण विश्वास ठेवेल यांच्यावरती? बिल्डरांच्या खिशातली माणसं सगळ्या गोष्टी पैशावर मोजायच्या सगळ्या गोष्टी पैशावर तोलायच्या आणि प्रचार काय करायचा आमचा भानुशाली म्हणे अमराठी आहे. अरे पण मराठी माणसासाठी झगडणारा तो अमराठी आहे. या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्या करणारा कोणताही अमराठी माणूस असू दे माझ्यासाठी तो मराठीच आहे.' असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर 'असली नालायक माणसं उभी देखील करता कामा नये तुम्ही. या मतदारसंघांमध्ये जे जे माणसं तुमच्या ओळखीची परिचयाची असतील त्यांना या माणसाचा इतिहास सांगा. मी आज फक्त आठवण करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. या गोष्टी विसरू नका. ज्याच्यातून विकले गेले ते पैसे आता बाहेर काढतील नक्की घ्या, पण या लोकांना जमीनदोस्त करा. जे आले ते त्यांच्याकडून गेलेच पाहिजे ते तुमच्या पर्यंत पोहोचलेच पाहिजे. ही माणसं कोणाच्या बापाची नाहीत. कोणाची होवू शकत नाही. हे तुमचाही कधी केसाने गळा कापतील तुमचं तुम्हालाही कळणार नाही.' असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Raj Thackeray on Dilip Lande
Mumbai Dabbawala Association : मुंबई डबेवाला संघटनेने महायुतीला जाहीर केला पाठिंबा!

याशिवाय 'आज एक रिपोर्ट आला आहे, मला वाटतं मुंबईतील प्रत्येक हिंदूने हा रिपोर्ट वाचला पाहिजे. नीट लक्षात ठेवला पाहिजे. अत्यंत गंभीर रिपोर्ट आहे. त्यात लिहिलेलं आहे की, मुंबईत बांग्लादेशीयांचं आणि मान्यमारमधून आलेल्या रोहिंग्यांचं इतकं प्रमाण वाढतय, इतकी लोकं आतमध्ये येताय की पुढील दहा वर्षांत मुंबईत हिंदूंचा टक्का 50 टक्क्यांच्या खाली येईल आणि हे नसीम खान(Naseem Khan) वाले जे आहेत हे त्यांना पाठिंबा देतील. त्यांनाच कुरवाळतील तुम्हाला नाही कुरवाळणार.' असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Dilip Lande
Anant Geete News : 'मतदाररूपी भीम महाराष्ट्रातील 'या' बकासुराचा नाश करणार', अनंत गीतेंनी उल्हासनगरातून डागली तोफ!

'कारण, जेव्हा देश आणि धर्म ही गोष्ट येते त्या वेळेला ते धर्म निवडतात. ज्यावेळेला धर्माचा विषय होतो तेव्हा ते त्यांच्या लोकांना साथ देत असतात. म्हणून इथे असलेल्या सर्व हिंदू बंधू-भगिनींनी जागृत राहिलं पाहिजे. तुमच्यासमोर असलेल्या त्या दोघांपैकी एक केसाने गळा कापणारा आहे आणि एक धर्माने गळा कापणारा आहे आणि तुमच्यासमोर हा जो मी भानूशाल दिलेला आहे तो कडवा हिंदू आहे. कडवा मराठी आहे.' असं म्हणत राज ठाकरेंनी मतदारांना मनसेच्या उमेदवारास मतदान करण्याचे आवाहनही यावेळी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com