Vinod Tawde : विनोद तावडेंनी मानले शरद पवारांचे आभार, नेमकं कारण काय?

Maharashtra Assembly Election Vinod Tawde Sharad Pawar : हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा विनोद तावडे यांच्यावर टीका केली. ठाकूर म्हणाले, तावडे मुंबईत गेल्यानंतर त्यांना कंठ फुटला आहे. तावडेंची अवस्थाही भिजलेल्या कोंबडी सारखी झाली आहे.
Vinod Tawde Sharad Pawar
Vinod Tawde Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Vinod Tawde New : भाजप नेते विनोद तावडे हे विरारमध्ये आले होते तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घेरावा घातला होता. तावडे हे पाच कोटी रुपये वाटण्यासाठी आले असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला. विनोद तावडे यांच्यावर टीका होत असताना शरद पवारांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले, विनोद तावडे एक चांगले गृहस्थ आहेत, आरोप सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही. पवारांच्या या प्रतिक्रियेसाठी तावडेंनी त्यांचे आभार मानले आहेत. तावडे म्हणाले, शरद पवार हे परिपक्व नेते आहेत. सिनियर आहेत. ते मला जवळून ओळखतात. मी अशा गोष्टीत असू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. मी त्यांचे आभार मानतो.

Vinod Tawde Sharad Pawar
Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat : 'एक्झिटपोल'चे आकडे जाहीर होताच फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट

विनोद तावडे यांनी विरारच्या प्रकरणावरून स्पष्टीकरण देताना सीसीटीव्ही तपासा असे आवाहन केले तसेच मी वाड्याहून परतताना नालासोपाऱ्यात आलो. निवडणकीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी काय करायचे हे सांगत होतो त्यावेळी हितेंद्र ठाकूर आले आणि त्यांनी माझ्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला.

तावडेंची अवस्था कोंबडी सारखी

हितेंद्र ठाकूर यांनी आज (बुधवारी) पुन्हा विनोद तावडे यांच्यावर टीका केली. ठाकूर म्हणाले, तावडे मुंबईत गेल्यानंतर त्यांना कंठ फुटला आहे. तावडेंची अवस्थाही भिजलेल्या कोंबडी सारखी झाली आहे.

गृहविभागाकडून तावडेंवर पाळत?

खासदार संजय राऊत यांनी तावडे हे भविष्यात आपल्याला जड होतील त्यामुळे त्यांच्या विरोधात कारस्थान झाले. महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून तावडेंवर पाळत ठेवली गेली आणि ते पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला, असा दावा राऊत यांनी केला.

Vinod Tawde Sharad Pawar
Solapur Voting : सोलापुरात 65.41 टक्के मतदान; 2019 च्या तुलनेत वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com