Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat : 'एक्झिटपोल'चे आकडे जाहीर होताच फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट

BJP becomes largest party in Mahayuti, chief minister post discussions: महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असल्याने आता मुख्यमंत्रिपदाबाबत विविध चर्चांना उधाण!
Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat
Devendra Fadnavis meet Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपात एक्झिट पोलचे आकडे धडकू लागले आहेत. एक्झिट पोल महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून येणार असल्याचे सागंत आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एवढंच नाहीतर यावरून संघातून पुन्हा फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर केले जाणार असल्याचा तर्कही लावल्या जात आहे.

मतदान असल्या सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आज (बुधवार) नागपूरमध्येच होते. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी मतदान केले. मात्र फडणवीस आणि सरसंघचालकांच्या भेटीमुळे राज्यात भाजपच सत्तेवर येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या एक्झिट पोल सरासरी दीडशे ते पावणे दोनशे आमदार भाजप महायुतीचे निवडून येणार असल्याचे दावे करीत आहेत. ही आकडेवारी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी आहे.

महायुतीमध्ये भाजप (BJP) मोठा भाऊ होता. चाळीस आमदार असताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. महायुतीची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही भाजपची मजबुरी होती. आता मात्र पुन्हा सर्वाधिक जागा जिंकल्यास भाजप आपला मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडणार नाही असे बोलले जाते. मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय घेण्यापूर्वी भाजपला संघाची पसंती घ्यावी लागते, असंही सांगितलं जातं.

Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat
Vidhansabha Election Exit Poll : एक्झिटपोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचंच पारडं जड; 'मविआ' बहुमतापासून लांबच!

विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) पुन्हा मोठा भाऊ ठरल्यास मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचं दिसत आहे. तर याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सरससंघचालकांची भेट घेतली असावी असाही तर्क लावला जात आहे. फडणवीस यांनी मोहन भागवत यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली. या भेटीत दोघांशिवया दुसरे कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे कोणालाच माहीत नाही. फक्त मतदान आटोपताच ही भेट झाल्याने यामागे राजकीय कारणाशिवाय दुसरे काहीच नसावे असाही अंदाज बांधला जात आहे.

Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat
Assembly Election Exit Poll : सर्वाधिक जागा भाजपला, युती की आघाडीची सत्ता? एक्झिट पोलने कुणाचं वाढवलं टेन्शन?

फडणवसींना असंही म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजप सत्तेत येते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवर महायुतीचच सरकार येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com