मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी(ता.7) घाटकोपरमध्ये सभा पार पडली.यावेळी त्यांनी महायुती सरकारसह महाविकास आघाडीवरही हल्लाबोल केला.ठाकरे म्हणाले,सत्तेत नसताना देखील मनसेनं रिझल्ट दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले,शेतकऱी आत्महत्या करतातच आहे.महिला असुरक्षित आहेत. लहान मुलींवर बलात्कार सुरु झाले.मनसेने हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर जगासमोर आलं.कोणत्या वातावरणात जगताय तुम्ही.कसल्या निवडणुका घेऊन बसलोय आपण. नुसतं उन्हा-तान्हात उभे राहताय पदरी काही पडत नाहीये.तुमचा स्वाभिमानी कणा मतदानाच्या दिवशी जागृत राहिला पाहिजे.एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा. नालायक ठरलो तर परत येणार नाही.दुकान बंद करुन टाकेल.महाराष्ट्राताला जे गत वैभव होतं, ते परत मिळवून द्यायचं आहे,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेसने चक्क वोट जिहाद करण्याच्या बदल्यात ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या सतरा मागण्या पूर्ण करण्याचे लेखी वचन ऑल इंडिया बोर्डला दिले आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर घाव घालण्याचा सौदाच केला आहे. 31 ऑक्टोबर 2024 ला ऑल इंडियाचे उलमा बोर्डाचे चेअरमन नायब अन्सारी यांची फेसबुक पोस्ट पहा. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की ऑल इंडिया उलमा बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा हवा असल्यास त्यांनी त्यांच्या सतरा मागण्या मान्य कराव्या आणि सत्तेत आल्यावर त्या मागण्यांची पूर्तता करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या नराधमांच्या तावडीत देऊ नका. येत्या 20 तारखेला मतदानासाठी नक्की बाहेर पडा व महायुतीला मतदान करा, असे आवाहन भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका 8 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात सुरू होतो आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात 12 तारखेला मोदींच्या सभा आणि रोड शो देखील करणार आहेत. मोदींच्या 14 नोव्हेंबरला तीन जाहीर सभा संभाजीनगर, रायगड आणि मुंबईत येथे होणार आहे.
विधानसभा निवडणुकीतमध्ये बंडखोरी करणाऱ्या पुण्यातील कमला व्यवहारे, आबा बागुल तर, सांगलीमतदारसंघातील जयश्री पाटील, रामटेक मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोल मतदारसंतील याज्ञवल्क्य जिचकार यांच्यावर काँग्रेसने कारवाई करत पक्षातून निलंबित केले आहे.
विधानसभा निवडणुकीतमध्ये बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांवर त्यांच्या अधिकृत पक्षाकडून कारवाई करण्यात येत आहे. भाजपने नुकतीच 40 बंडखोरांना पक्षातून निलंबित केले आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील मोठे पाऊल उचलत नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदरासंघात बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र मुळक आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे याज्ञवल्क्य जिचकार यांच्यावर निलंबणाची कारवाई केली आहे समावेश आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल माजी राज्यमंत्री, भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरणारे सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. नुकतीच प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उद्यापासून (गुरुवारपासून) महाराष्ट्रात सभांचा धडका लावणार आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. तोपर्यंत अजित पवार तब्बल 60 सभा घेणार आहेत. दिवसाला 4 -5 सभा घेणार आहेत. सभेसोबत अजित पवारांचे रोडशो होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिथे जिथे उमेदवार आहेत. तेथे तेथ सभा घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
सातारा जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शेखर गोरे यांना आगामी काळामध्ये विधान परिषदेवर घेणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.
पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून राज्यातील विविध शहरांमध्ये पैसे सापडण्याचा सिलसिला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्यांना धमकी दिल्याची प्रकरणं समोर येत आहेत. अभिनेता सलमान खान याला दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अशातच आता शाहरुख खानला देखील धमकीचा फोन आल्यामुळे बॉलीवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन तीन सभांना अजित पवार उपस्थित असणार आहेत. ज्या ठिकाणी मोदींची सभा असेल तिथे राष्ट्रवादीचा एक मोठा नेता व्यासपीठावर असणार आहे. अजित पवारांच्या सभा असल्याने त्यांना सगळ्याच ठिकाणी हजर राहणे शक्य होणार नाही. यासाठी राष्ट्रवादीचा एक नेता मोदींच्या सभेसाठी असणार आहे. मोदींच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होता जाहीर सभा होणार आहेत.तर अजित पवारांच्या पण जवळपास ६० सभा होणार आहेत.
भाजपचे प्रदेश कार्यकारणीच सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला. यंदा त्यांनी चिंचवडमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही.
अजित पवारांच्या उद्यापासून महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू होणार आहे. महाराष्ट्रात जवळपास ६० सभा होणार असून, दिवसाला ४ -५ सभा अजित पवार घेणार आहेत. राज्यभर सभांसोबत अजित पवार रोड शो देखील घेणार आहेत.
काँग्रेसमधील 5 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. याममध्ये, राजेंद्र मुळीक, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, यज्ञवलकर जिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ढोबळेंना निवडीचे पत्र देण्यात आलं आहे. ढोबळे यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाने ढोबळेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सदाभाऊ खोतांचा फडणवीसांचा कुत्रा असा उल्लेख केला होता. राऊतांच्या याच टीकेला आता आमदार खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले "संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहे, डुकराला कितीही साबण लावला तरी ते घाणीतचं जातं. संजय राऊतांनी आम्हाला कुत्र्याची उपमा दिली, पण कुत्रे हे इमानदार असतं, ते धन्याची राखण आणि संरक्षण करतं. संजय राऊत यांनी 2014 ला कुणाचा फोटो गळ्यात घालून मतं मागितली हे पाहावं.", अशा शब्दात त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आहे. शरद पवारांबाबत सदाभाऊ खोत यांनी काल भाषणात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. पुणेरी स्टाईलने फोट वर आधी "श्री" लिहून "सदाभाऊ खोत मुर्दाबाद" असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
'भाषणात शरद पवार यांच्यावर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावगड्याची भाषा आहे. या भाषेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.', असं सदाभाऊ खोत म्हणाले.
Shivsena UBT Manifesto : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा वचननामा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. या वचननाम्यात त्यांनी कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार, मुंबईतून पळवलेलं वित्तिय केंद्र धारावीत नव्याने उभारणार. मुंलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देणार. जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे.
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू केल्याची माहिती दिल्ली उच्च न्यायालयाला सरकारी यंत्रणांनी माहिती दिली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे. शिवाय महायुतीत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शरद पवारांवरील वैयक्तिक टीका खपवून घेणार नसल्याचा इशारा खोत यांना दिला आहे. अशातच आता खोत यांनी पुण्यात होणारी पत्रकार परीषद पुढे ढकलण्यात आली आहे. पुर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे पत्रकार परीषद घेणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला होता.
भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राज्यात नऊ दिवसांत पन्नास सभा होणार आहेत.
मनसेचे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवर भाष्य केलं आहे. माझ्या हातात सत्ता दिल्यास एकाही मशिदीवर भोंगा लावू देणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. तर या वचननाम्यातून ठाकरे जनतेला कोणती आश्वासन देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.