Maharashtra Government Formation LIVE Updates : अखेर मुहूर्त ठरला! मोदींच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला होणार मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

Who is the CM of Maharashtra : राज्यातील महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. सत्ता स्थापनेच्या जोरदार घडामोडी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ते काल आपल्या साताऱ्यातील घरी गेल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आज भाजपचे वरिष्ठ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Narendra Modi
Narendra Modi sarkarnama

मोदींच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला शपथविधी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथिविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

विनोद तावडे-जेपी नड्डांमध्ये दीड तास चर्चा

महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात दीड तास चर्चा झाली. तावडे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलता तावडे निघून गेले.

उद्धव ठाकरेंचा हट्ट बाबा आढावांनी केला पूर्ण

तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या बाबा आढावांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत आपले उपोषण सोडले. EVM वर आक्षेप घेत तीन दिवसांपासून बाबा आढाव आंदोलन करत होते. आढाव यांच्या आंदोलनाला शरद पवार, अजित पवार यांनी भेट दिली होती.

संजय राऊत, उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीला

बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. आज सकाळी बाबा आढाव यांची भेट शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर आत्ता उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बाबा आढव यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ठाकरे यांच्या समोर बाबा आढावांनी निवडणूक गैरप्रकार झाल्याची भूमिका मांडली.

Ajit Pawar meets Baba Adhaav : अजित पवार बाबा आढाव यांच्या भेटीला

EVM विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. तर याच उपोषणस्थळी जात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव यांची भेट घेतली. महत्वाची बाब म्हणजे आज सकाळीच या आंदोलनाला जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता अजित पवार देखील या आंदोलन स्थळी गेले आहेत.

Tanaji Sawant : EVM मधील मायक्रो कंट्रोलरची पडताळणीची मागणी

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांनी आक्षेप घेत ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे शुल्क भरून अर्ज केला आहे. मोटे यांना 18 बूथ वरील ईव्हीएम वर संशय असून एका बूथसाठी 47 हजार दोनशे रुपयांची रक्कम त्यांनी भरली आहे. असे एकूण 8 लाख 49 हजार 600 रुपये त्यांनी EVM पडताळणीसाठी भरले आहेत.

Rahul Narvekar : नवीन सरकाराचा शपथविधी 5 तारखेपर्यंत - राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेची तारीख सांगितली आहे. ते शनिवारी साई दरबारात आले होते. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना 5 तारखेच्या आसपास नवीन सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती दिली

Sharad Pawar Live News : शरद पवारांनी बोलावली आमदारांची बैठक

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या आमदारांची उद्या दुपारी 2 वाजता पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे.राज्यभरात इव्हीएम वर संशय व्यक्त केला जात असतानाच पवारांनी ही बैठक बोलावल्यामुळे त्यांच्या पक्षाकडून EVM विरोधात मोठी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Health Update : CM शिंदे कुणालाही भेटणार नाहीत

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावी गेले आहेत. अशातच त्यांना किरकोळ ताप आणि कणकणी आल्याने ते आज दिवसभर विश्रांती घेणार असून दिवसभरात कुणालाही भेटणार नसल्याची माहिती आहे. एकीकडे राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असतानाच शिंदे आजारी पडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Mahadev Jankar : महायुतीचा खूप वाईट अनुभव आला - महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि एकेकाळचे महायुतीतील घटक असलेल्या महादेव जानकर यांनी आपणाला महायुतीचा खूप वाईट अनुभव आला असल्याचं म्हटलं आहे. शिवाय यामुळेच महायुतीतून बाहेर आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आपणाला अद्याप काँग्रेसचा अनुभव नाही. त्यामुळे आता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका घेतल्याचंही स्पष्ट केलं.

तर भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला आजिबात पडायचं नाही. मात्र, अनेक ठिकाणी EVM मध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी जानकर यांनी केला. ते म्हणाले, "EVM वर माझा आक्षेप असून देशभरात EVM विरोधात आंदोलन करणार आहे. EVM मुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. EVM हॅक करता येत, मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहीती आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही."

Ramraje Naik Nimbalkar : झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिलेले रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रामराजे यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला, "झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात. सुरक्षित, आधुनुक, संपन्न सातारा जिल्ह्यासाठी." असा मजकूर लिहिला आहे. तर फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर रामराजे पहिल्यांदा स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. त्यामुळे रामराजे यापुढे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar PC Live : लोकांना जागृत करावं लागेल, जागरूक आहेत त्यांनी उठाव केला पाहिजे - पवार

EVM विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला आज जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आला आणि या निवडणुकीत पैशांचा महापूर आला होता अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचं म्हटलं. तसंच "राज्यात आणि देशात पैशांचा वापर करून निवडणूक जिंकली, त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. संसद आणि संसदेच्या बाहेर जे लोक भेटले त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. पाच लोकांमध्ये चर्चेचा सूर आहे बाबा आढाव यांनी पुढाकार घेतला आहे ते आत्मक्लेष करत आहेत. बाबांनी एकेट्यांने ही भूमिका घेणं योग्य नाही लोकांनी पण उठाव केला पाहिजे, नाहीतर लोकशाही धोक्यात येईल." असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar meets Baba Adhaav : सरकारला विरोधक नकोत - आढाव

EVM विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी बोलताना बाबा आढाव यांनी सरकारला विरोधक नकोच आहेत, असं वक्तव्य केलं. तर आढाव यांच्या भेटीनंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करण्यात आला. तसंच या निवडणुकीत पैशांचा महापूर आला होता असं म्हणत महायुतीवर टीका केली.

Murlidhar Mohol माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा निर्थरक

सोशल मीडियावर भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार असून नुकतेच पुण्यातून लोकसभेवर गेलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या सर्व चर्चा निरर्थक असल्याचं खुद्द मंत्री मोहोळ यांनी सांगितलं आहे. मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे." असं त्यांनी म्हटलं आहे.

CM Eknath Shinde Live News : गृहमंत्र पदासाठी शिंदेगट आग्रही 

मुख्यमंत्रिपद सोडलं असलं तरी शिंदेंची शिवसेना गृहमंत्र पदासाठी आग्रही आहे. शिंदे उपमुख्यमंत्री अशताना त्यांच्याकडे गृहमंत्री होते. त्यामुळे आता ते मुख्यमंत्री होणार असतील तर गृहमंत्रिपद आमच्याकडे असावं, असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे.

Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदे नाराज, युतीचा मुख्यमंत्री ठरेना

राज्यातील महायुतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. सत्ता स्थापनेच्या जोरदार घडामोडी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com