Ghansawangi Assembly Constituency 2024 : शिवसेनेच्या शिवाजी चोथेंचा दावा, घनसावंगीत टोपेंची डोकेदुखी वाढणार !

Shiv Sena's claim on Rajesh Tope's constituency : नुकताच शिवाजी चोथे यांनी शिवसैनिकांचा मेळावा मतदारसंघात घेतला. या मेळाव्यात मतदाारसंघावर दावा करतानाच पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
MLA Rajesh Tope News
MLA Rajesh Tope NewsSarkarnama
Published on
Updated on

सुभाष बिडे

Mahavikas Aghadi Political News : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता महायुती-महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी चुरस सुरू झाली आहे. दोन्ही बाजूने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी जागा वाटपासाठी अधिकचा वेळ घेतला जात आहे. तिकडे मुंबई-दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, तर इकडे मतदारसंघामध्ये मात्र मित्र पक्षांच्याच जागावर दावा सांगितला जात आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसवांगी विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार शिवाजी चोथे यांनी दावा सांगितला आहे.

आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाते. माजी मंत्री राजेश टोपे हे घनसांवगीचे विद्यमान आमदार होते. (Rajesh Tope) टोपे यांची उमेदवारी फिक्स समजली जात असताना ऐनवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदारंसघावर दावा केल्याने टोपेंच्या अडचणी वाढणार आहे. अद्याप महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झालेले नाही, त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर होईल तेव्हा चोथे यांचा दावा किती खरा किती खोटा? हे स्पष्ट होईल.

नुकताच शिवाजी चोथे यांनी शिवसैनिकांचा मेळावा मतदारसंघात घेतला. या मेळाव्यात मतदाारसंघावर दावा करतानाच पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीत उमेदवारी जाहीर होण्याआधीच बंडाची भाषा सुरू झाल्याने नेत्यांना त्यांना थंड करण्यासाठी वेगवान हालचाली कराव्या लागणार आहेत. इकडे महाविकास आघाडीत बंडाचा इशारा दिला जात असताना तिकडे महायुतीतील भाजपाचे सतीश घाटगे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.

MLA Rajesh Tope News
Rajesh Tope News : जरांगेंच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांची गर्दी; टोपेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले...

घाटगेंचा महायुतीला दम

साखर कारखान्याच्या माध्यमातून घनसावंगीत आपले बस्तान बसवू पाहणाऱ्या घाटगे यांना नुकताच धक्का बसला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. हिकमत उढाण यांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला तेव्हा. (NCP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उढाण यांच्या गूळ पावडर कारखान्याच्या दुसर्‍या युनीटचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हा शिवसेनेकडून उढाण यांना घनसवांगीतून उमेदवारी दिली जाणार, असे निश्चित मानले जाते.

उढाण यांच्यामुळे घाटगेंच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर आपण वेगळा विचार करू, म्हणत घाटगे यांनीही बंडाचे निशाण फडकवण्याचा इशारा दिला आहे. सतीश घाटगे यांनी छतीसगडचे आमदार तथा पक्ष निरीक्षक गौतम गोलेच्छा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवारी न मिळाल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याचा दम दिला होता.

MLA Rajesh Tope News
Ashti Assembly Elections 2024: महायुतीत पेच; भाजपच्या सुरेश धसांच्या उमेदवारीला विद्यमान NCP आमदाराचा विरोध; बंडखोरीचा इशारा

त्यामुळे घनसावंगीत बंडखोरी होणार हे निश्चित मानले जात आहे. निवडणुकीच्या या आखाड्यात आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी मनिषा,भाजपाचे सतीश घाटगे यांच्या पत्नी वैशाली, डॉ. हिकमत उढाण यांच्या पत्नी माया यांनीही उडी घेत पतीदेवांच्या पाठीशी भक्कम पाठबळ उभे केल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com