Video Satej Patil : 'शक्तिपीठ महामार्ग कंत्राटदारांच्या सुपीक डोक्यातून', सतेज पाटलांनी सुनावले

Maharashtra Assembly Monsoon Session Satej Patil : महामार्गातून शक्ती कोणाला मिळणार,या महामार्गावर जमीन अधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत का? हे तपासून पहा, कारण समृद्धी महामार्गाचा अनुभव आहे, असे देखील पाटील यांनी सुनावले.
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Satej Patil News : महत्वाकांक्षी प्रकल्प शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरात विरोध झाला होता. या महामार्गाविषयी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली. महामार्गाला विरोध करताना आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधीला चौपट रक्कम दिली तरी हा महामार्ग शेतकऱ्यांना नको आहे. शक्तपीठ महामार्ग कंत्राटदारांच्या सुपीक डोक्यातून आला असल्याचे ठणकावून सांगितले.

महामार्गातून शक्ती कोणाला मिळणार? महामार्गावर जमीन अधिकाऱ्यांनी घेतल्या आहेत का? हे तपासून पहा, कारण समृद्धी महामार्गाचा अनुभव आहे, असे देखील पाटील यांनी सुनावले.

जी हुजूर कोण आहे ज्यांच्यासाठी हा मार्ग हो आहे. आमचा वारकरी चालत पंढरपुरला जातो. त्याने रस्ता मागितला नाही. शक्तिपीठाच्या रस्त्याची मागणी नाही. तुम्ही तुमच्या डोक्यातून कंत्राटदाराच्या सुपीक डोक्यातून हा रस्ता आला आहे, असे सतेज पाटील Satej Patil म्हणाले.

Satej Patil
Eknath Shinde : "आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षावर बंगल्यावर बसून..."

27 हजार शेती या महामार्गामुळे बाजुला जाणार आहे. सरकारने 200 कोटी पूर थांबवण्यासाठी तरदूत केली आणि इकडे 48 पूल बांधणार आहेत. म्हणजे पूरालाच आमंत्रण देत आहेत. बजेटमध्ये प्रत्येकावर 56 कोटी कर्ज असल्याचे दिसले. ते कर्ज 86 हजार कोटींचा हा रस्त्या करून अजून वाढवायचे आहे का? चौपट काय पण दहा पट रक्कम दिली तरी हा रस्ता नको आहे, असे पाटील म्हणाले

शक्तिपिठाचा मार्ग कोणाता?

शक्तिपीठाचा प्रस्ताविक मार्ग हा कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com