Video Ajit Pawar : अजितदादा जयंतरावांना असं का म्हणाले, 'श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा'

maharashtra assembly session Ajit Pawar presented the poem : '...एवढं लक्षात ठेवा!' या शब्दावर जरा जास्तीच जोर देत होते. अजितदादांना कविता सादर करताना पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी देखील हसत हसत दाद दिली.
Ajit Pawar On Jayant Patil
Ajit Pawar On Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : अर्थसंकल्पावरील वातावरण तसे गंभीर. विरोधक उपमुख्यमंत्री अजितदादांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. अजितदादा आणि जयंत पाटील यांचा कलगीतुराही चांगलाच रंगला. मात्र, अर्थसंकल्पावर उत्तर देताना अजित पवारांनी विंदा करंदीकर यांची कविता 'एवढं लक्षात ठेवा!' आपल्या शैलीत वाचून दाखवून विरोधकांना टोले लगावले.

अजित पवार कविता सादर करत असताना '...एवढं लक्षात ठेवा!' या शब्दावर जरा जास्तीच जोर देत होते. अजितदादांना कविता सादर करताना पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी देखील हसत हसत दाद दिली.

अजितदादांनी Ajit Pawar अर्थसंकल्प साजर करताना घोषणाचा पाऊस पाडला. अजितदादांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गेमचेंजर ठरेल, असा विश्वास महायुतीतील नेते व्यक्त करत आहेत. मात्र, हा त्रुटीचा अर्थसंकल्प साजर करत महायुती लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यावरून जयंत पाटलांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना अजितदादांना चिमटे काढले होते.

Ajit Pawar On Jayant Patil
Legislative Council Election : 'एकाचा बळी निश्चित, हमारे पास मुख्यमंत्री शिंदे साहब है', शिंदेंच्या आमदाराला विजयाचा काॅन्फिडन्स

विरोधकांना प्रत्युत्तर

अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर Budget उत्तर देताना म्हणाले की मी मागली 15 वर्षांचा रेकाॅर्ड पाहिला पण पहिल्यांदाच 70 सभासदांनी अर्थसंकल्पवार चर्चा केली. या आधी 40 सदस्य चर्चेत सहभागी होत होते. मात्र पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या संख्येने सभासद चर्चेत सहभागी झाल्याने नक्कीच अर्थसंकल्प चांगला असावा. विरोधकांचे कामच आहे टीका करणे मात्र त्यांनी देखील अर्थसंकल्पातील चांगल्या बाबींचा उल्लेख केला.

अजितदादांनी सादर केलेली कविता

एवढे लक्षात ठेवा - विंदा करंदीकर

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।

श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।

ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।

मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।

उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।

सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।

तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।

त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

Ajit Pawar On Jayant Patil
Legislative Council Election : 'एकाचा बळी निश्चित, हमारे पास मुख्यमंत्री शिंदे साहब है', शिंदेंच्या आमदाराला विजयाचा काॅन्फिडन्स

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com