Assembly Session update : सत्ताधारी आमदाराचाच विरोधकांना फुल सपोर्ट; अधिवेशनात सरकारची डोकेदुखी वाढविणारा मुद्दा धरला उचलून...

Amol Mitkari supports opposition : भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकार राजकारण करत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद आहे, असे ते म्हणाले.
Nagpur Winter session news
Nagpur Winter session news Sarkarnama
Published on
Updated on

Leader of Opposition Maharashtra issue : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी एका मुद्द्यावरून सरकारला चांगलेच घेरले आहे. तो मुद्दा म्हणजे विरोधी पक्षनेतेपद. विधिमंडळाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच विधानसभेसह विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेता असणार नाही. हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडणार आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

विरोधक आक्रमक झालेले असतानाच आता सत्ताधारी आमदारही त्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगत या आमदाराने सरकारलाच आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सोशल मीडियात विरोधी पक्षाबाबत एक सूचक पोस्ट केली आहे. मात्र, त्यामध्ये त्यांनी थेट विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख केलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘’लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे. सरकारवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष. केवळ सत्ताधारी नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात. विरोधी पक्षाशिवाय संसद ही फक्त “मोहोर उमटवण्याची संस्था” बनते. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)’’, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Nagpur Winter session news
Eknath Shinde Vs Ravindra Chavan : भर व्यासपीठावर शिंदेसोबत काल काय ठरलं? आज रविंद्र चव्हाणांकडून थेट एका पक्षप्रवेशालाच स्थगिती

मिटकरी यांनी या पोस्टमध्ये एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत जोरदार हल्लाबोल चढविला आहे. पत्रकार परिषदेत आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, अनिल देशमुख या नेत्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरले.

Nagpur Winter session news
Assembly Session : विधिमंडळाच्या इतिहासात विरोधकांवर पहिल्यांदाच 'ही' नामुष्की; फडणवीस-शिंदे-पवारांनी कामच असं केलंय...

भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकार राजकारण करत असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक पद आहे. ते कुठल्या परंपरेने चालत आलेले नाही. तसेच १० टक्के सदस्यसंख्या अपेक्षित असल्याची माहितीही चुकीची आहे. ज्या विरोधी पक्षाचे जास्त आमदार, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असा नियम असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com