Maharashtra Politics: ठाकरे सेना-मनसे एकत्र; कडूंना अश्रू अनावर; वाचा महत्वाच्या घडामोडी

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dombivli News:  मनसे- ठाकरे गट एकत्र, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा 

ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही, हे सध्या कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशातच डोंबिवलीत ठाकरे सेना आणि मनसैनिक एकत्र आले. एका कार्यक्रमाच्या चहापान समारंभात दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र आले. त्यांच्या चर्चा रंगल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकरे गटाच्या शाखेत मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत गेले आणि त्यांनी ठाकरे सेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांचे स्वागत करीत त्यांना पुष्पगुच्छ दिला.

Dhule News:  अनिल गोटे यांचा महायुती सरकारवर निशाणा 

धुळे विश्रांतीगृह कॅश प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवरून अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिग्नल तोडला तरी यापेक्षा जास्त शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे, आणि त्यापेक्षाही हे प्रकरण कमी महत्वाचे आहे का? असा संतप्त सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

bacchu kadu live: उपोषण स्थळी येताच नयना कडूंना अश्रू अनावर  

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करीत असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची पत्नी नयना कडू या उपोषण स्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही आहे. बच्चू कडू यांच्या तब्येतीची माहिती घेत असताना नयना यांना अश्रू अनावर झाले.

Pune News: पोलिस निरीक्षकाच्या धमकीनंतर हवालदार बेपत्ता

पुण्याच्या इंदापुरातून पोलीस हवालदार विष्णू केमदारणे काल पहाटेपासून (10 जून) बेपत्ता झाले आहेत. केमदारणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीमधून इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केमदारणे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

BMC Election :मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे सेनेचे 12 शिलेदार ठरले! 

BMC Election : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रणनिती आखली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील 12 जणांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे सेनेनं कंबर कसली आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

  1. नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड

  2. सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द

  3. मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा

  4. अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा

  5. सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी

  6. विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम

  7. रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम

  8. अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी

  9. अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे

  10. उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम

  11. विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व

  12. गुरुनाथ खोत - चांदिवली, कलीना, कुर्ला

bacchu kadu live: बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात  

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रहारच्या शहराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Central Cabinet Meeting : आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. मुंबईत नुकताच रेल्वे अपघात झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नवीन रचेनेबाबत बैठकीत मोठी घोषणा होण्याती शक्यता आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होत आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येणार आहे.

Raj Thackeray News:  राज ठाकरे  देणार कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (गुरुवारी) ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात राज ठाकरे बैठक घेणार आहेत. कार्यकर्त्यांना ते आगामी निवडणुकीच्या तयारीचा कानमंत्र देतील, अशी माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com