

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झालं असून यंदा अचानक अजित पवार यांच्या निधनामुळं त्यांनी तयार करुन ठेवलेलं बजेट हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस सादर करणार आहेत. यंदा एकूण २६ दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार असून त्यामध्ये सुट्ट्या वगळता २० दिवस कामकाज सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं टाईमटेबल जाहीर केलं आहे. त्यानुसार, २३ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार असून ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. एकूण २६ दिवस अर्थसंकल्प अधिवेशन सुरू राहणार असून त्यामध्ये सुट्ट्या वगळता २० दिवस कामकाज सुरू राहणार आहे.
दरम्यान, दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. पण त्यांच्यानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असल्यानं त्यात अर्थसंकल्प कोण सादर करणार? याची चर्चा सुरु झाली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही धुरा खांद्यावर घेतली आणि अजितदादांनी अर्थसंकल्प मांडायची सर्व तयारी केल्याचं सांगितलं होतं.
अर्थसंकल्पावर काम करण्यासाठी किमान ६ महिन्यांपासून काम सुरु असतं. यामध्ये विविध योजना, तरतूदी, नव्या योजना, आयत्या वेळेला येणारे विषय आणि त्यासाठी करण्यात येणारी तरतूद यासर्व गोष्टींवर अर्थसंकल्पासाठी काम करावं लागलं. अजित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून याच प्रक्रियेत होते. पण आता फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळं आयत्यावेळी त्यात काय बदल होतो हे पाहावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.