Maharashtra budget 2026 : सर्वात मोठी बातमी! अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा

Maharashtra Farm Loan Waiver : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज शुक्रवार (ता.०६) मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून त्यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा जाहीर केल्या आहेत.
devendra fadnavis
Devendra Fadnavis announces Maharashtra farm loan waiver up to ₹2 lakh under Ahilyabai Holkar scheme in Budget 2026 for eligible farmers with pending crop loans.sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Farm Loan Waiver : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज शुक्रवार (ता.०६) मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून त्यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक मोठमोठ्या योजना जाहीर केल्या आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. ते म्हणाले, "आम्ही राज्यातील शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली असून राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकर्‍यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना मी जाहीर करीत आहे", अशी घोषणा फडणवीसांनी सभागृहात केली.

devendra fadnavis
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प! अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांकडून घोषणा

तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं.

devendra fadnavis
Maharashtra Budget 2026: अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच अर्थसंकल्प! अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांकडून घोषणा

त्यामुळे या अर्थसंकल्पात तरी महायुती सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आजच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तसंच महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना, अशा विविध योजनांची घोषणा देखील त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com